সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, September 19, 2013

कृषी उत्पन्न समित्यांनी समस्यांचा बाजारच मांडला

चंद्रपूर जिल्हा हा भात, सोयाबीन आणि कापूस उत्पादक आहे. जिल्ह्याच्या पूर्व-उत्तर भागात भात, तर पश्चिम-दक्षिणेला कापूस पीक घेतले जाते. सोयाबीन हे पीक जिल्ह्यात सर्वत्र दिसून येते. जिल्ह्यात १३ बाजार समित्या असून, मोठ्या गावांत उपबाजार आहेत. मूल आणि नागभीड बाजार समितीत भाताची खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे या भागात व्यापारीवर्गाचीदेखील संख्या मोठी आहे. मात्र, अनेक बाजारांत लिलाव करण्याची पद्धत नाही. त्यामुळे शेतकèयांना अल्पदरात माल विकावा लागतो. शिवाय कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे संचालक मंडळ शेतकèयांच्या हिताच्या कोणत्याही योजना राबवीत नाहीत. केवळ वार्षिक उत्पन्नातून आपल्याला हिस्सा कसा मिळेल, यावरच डोळा ठेवून समितीच्या सभांना उपस्थिती असते. अनेक बाजार समित्यांत परिसरातील स्वच्छता, पाणीपुरवठ्याची व्यवस्था, पावसाळ्यात टिनांचे शेड, साठवणूक गोदाम, स्वच्छतागृह आदी व्यवस्था दिसत नाही. बाजार समितीत बाजारभावाची माहिती देणारे नोटीस बोर्ड, उपाहारगृह, अंतर्गत रस्ते, पार्किंग, अग्निशमन यंत्रणा, शेतकèयांसाठी विश्रामगृह, कचराकुंडी आदी मूलभूत सुविधा असणे आवश्यक आहे. मात्र, या सुविधा उपलब्ध नसल्याने कृषी उत्पन्न समित्यांनी समस्यांचा बाजारच मांडला आहे.
एपीएमसी                                      

मूल
स्थापना-१९६३
संपर्क- ०७१७४-२२०२१९
गावे- ११०
शेतमाल- धान, सोयाबीन
उपबाजार- राजोली, बेंबाळ, सुशी
राइसमिल-४७
निर्यात- मुंबई, नागपूर, ठाणे, सोलापूर, कोल्हापूर, नांदेड, औरंगाबाद
-------------------
राजुरा
स्थापना-१९७५
संपर्क- ०७१७३-२३०६५३
शेतमाल- कापूस, सोयाबीन, तूर
गावे- १४२
तीन- गोदाम
एक - लिलाव शेड
एक- दुकानांचे गाळे
एक- बाजार समितीचे कार्यालय
निर्यात- नागपूर, आदिलाबाद
६६- व्यापारी, ८ हमाल, ९ भारवाहक, १५ दलाल
-------------------
कोरपना
स्थापना- २००३
संपर्क- ०७१७३-२३६४०४
शेतमाल- कापूस
१२- व्यापारी गाडे
एक- लिलाव शेड
सात -कर्मचारी
चार -रोजंदारी मजूर
३०- व्यापारी
३३- अडते
५०- हमाल मापारी
१३- जनावर खरेदी व्यापारी
६- दलाल
गावे- १९४
कोरपना तालुका- ११३
जिवती तालुका- ८३
-----------------

भद्रावती
स्थापना- १९८९
संपर्क- ०७१७५-२६६०९४
गावे- १६४
लोकसंख्या- १ लाख ५७ हजार
उपबाजार- चंदनखेडा, किलोणी, पाटाळा, नंदोरी
शेतमाल- धान, कापूस, तूर, गहू
-------------------
सिदेवाही
स्थापना- १९६२
संपर्क- ०७१७८-२८८२७८
शेतमाल- धान
गावे- ११२
लोकसंख्या- एक लाख ६ हजार २७५
उपबाजार- नवरगाव, पळसगाव जाट
राइसमिल- २४
निर्यात- मुंबई, अकोला, ठाणे, नागपूर
१४३ व्यापारी, हमाल ४२, दलाल ७, भारवाहक १२७, प्रक्रियाधारक २४
---------------------------

वरोरा
स्थापना-१९३५
संपर्क- ०७१७६-२८२०२४
शेतमाल- कापूस, सोयाबीन, धान
गावे- १८९
उपबाजार- खांबाडा, शेगाव, माढेळी
निर्यात- नागपूर, मुंबई, काकीनाटा (आंध्र प्रदेश)
१० व्यापारी, २५ दलाल, १० प्रक्रियाधारक, २६ भारवाहक, १० हमाल
-------------------
सावली
स्थापना- १९९५
संपर्क- ०७१७४-२७४४८६
शेतमाल- धान, सोयाबीन
गावे-१११, लोकसंख्या- एक लाख ४ हजार
राइसमिल-१९
उपबाजार- पाथरी, व्याहाड
निर्यात- मुंबई, नागपूर, ठाणे, कोल्हापूर, नांदेड
--------------
नागभीड
स्थापना- १९६०
संपर्क- ०७१७९-०४००३८
शेतमाल- धान
गावे- १३८
उपबाजार- तळोधी बाळापूर
निर्यात- चेन्नई, मुंबई, नांदेड, अकोला, नागपूर, ठाणे
दलाल ३४, गोदाम ६, भारवाहक २१, व्यापारी १८८, जनावरे विक्री दलाल ३, हमाल १२६, प्रक्रियाधारक मअङ्क गट १८, मबङ्क गट ११, किरकोळ विक्रेते मअङ्क गट १९, मबङ्क गट ५६
--------------------------
तळोधी बाळापूर
नागभीड बाजार समितीचा उपबाजार असलेल्या तळोधी बाळापूर येथे दोन लाख ४४ हजार १६२ qक्वटलची वार्षिक आवक आहे. यातून ४३ कोटी ८२ लाख रुपयांची उलाढाल होते. मध्यवर्ती ठिकाण असल्याने येथे चिमूर, qसदेवाही, ब्रह्मपुरी, नागभीड तालुक्यातील शेतकरी माल विक्रीस आणतात. गेल्या काही दिवसांत परतालुक्यातून आलेला माल नऊ हजार ४६३ qक्वटल होता. येथे पाच शेड, चार गोदाम असून, १३०० मेट्रिक टन शेतमालाची साठवणूक क्षमता आहे. जागतिक बँकेच्या अर्थसाह्याने महाराष्ट्र कृषी स्पर्धात्मक विकास प्रकल्पातून एक कोटींचा निधी मिळाला. यातून गोदाम आणि शेडचे बांधकाम केले जाईल. बाजार परिसरात साईमंदिराचे बांधकाम करण्यात आले असून, देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी आहे. आमदार मितेश भांगडिया यांच्या आमदार निधीतून सिमेंट क्राँक्रिट रस्त्याचे काम सुरू आहे. बाजार समितीतङ्र्के दरवर्षी सार्इंच्या प्रगटदिनी ३० हजार नागरिकांना भोजनदान दिले जाते. शेतकèयांसाठी सांस्कृतिक भवनाचे बांधकाम करण्यात आले असून, अत्यल्प दरात ते दिले जाते. सात टक्के दराने तारण कर्ज योजना असून, ५२ व्यापारी आणि २२ अडते कार्यरत आहेत.

अपेक्षा
शेतकèयांचा माल ठेवण्यासाठी आणि पावसाळ्यात खराब होऊ म्हणून परिसरात फ्लोरिंग करण्याची गरज आहे. मालाची आवक लक्षात घेता अतिरिक्त शेड बांधण्यात यावेत. तारण योजना नोव्हेंबरपासून सुरू करण्यात यावी आणि शेतकèयांना २४ तासांत रक्कम मिळावी.
----------------------
कृषी उत्पन्न बाजार समिती, राजुरा
राजुरा : ३८ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या राजुरा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने कास्तकारांच्या सुविधेचे प्रश्न हाताळत प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. कधीकाळी कर्जाच्या ओझ्याखाली असलेली ही बाजार समिती आता ७३ लाखांचे वार्षिक उत्पन्न मिळवून ३७ लाख रुपयांहून जास्त नङ्का कमवीत आहे. या बाजार समिती यार्डवर १४२ गावांतील हजारो कास्तकारांच्या शेतमालाची खरेदी-विक्री केली जाते. याशिवाय येथे भरणाèया बैलबाजारालाही भरपूर प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते.
राजुरा, जिवती तालुक्यातील कास्तकारांसाठी राजुरा बाजार समिती अगदी वरदान ठरलेली आहे. रामपूर ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या या बाजार समितीची स्थापना तीन जुलै १९७५ रोजी झाली. सुमारे दोन हेक्टर ४० आर. अशा प्रशस्त परिसरात या समितीचा कारभार चालतो. समितीच्या परिसरात तीन प्रशस्त गोदाम, एक लिलाव शेड व दुकानांचे गाळे आणि याच परिसरात बाजार समितीचे कार्यालय, अशा सुविधा आहेत.
धान्य खरेदी-विक्रीचा हंगाम सुरू झाला की, हा परिसर गर्दीने ङ्कुलून जातो. कापूस आणि सोयाबीन याशिवाय तूर, चना यासारख्या शेतमालाची येथे बाजारपेठ भरते. २०१२-१३ यावर्षी तब्बल ५२ हजार ७२९ qक्वटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली. त्याखालोखाल ४९ हजार २२७ qक्वटल कापसाची खरेदी करण्यात आली. तूर १९१६ qक्वटल आणि चना १२०९ qक्वटल खरेदी करून या एकूण खरेदीतून बाजार समितीला एकूण ७३ लाख ५१ हजार १२२ रुपयांचे उत्पन्न झाले. यापैकी ३५ लाख ५६ हजार १६६ रुपये खर्च वजा जाता बाजार समितीला ३७ लाख ९४ हजार ९५६ रुपयांचा निव्वळ नङ्का झाला. मागील काही वर्षांपासून सुरू असलेल्या या ङ्कायदेशीर व्यवहारातूनच बाजार समितीने शेतकèयांच्या सुविधेसाठी स्वनिधीतून सुमारे एक कोटी रुपयांची विकासकामे केली आहेत. यात तीन बंद गोदाम, एक लिलाव शेड, कुंपण qभत, अशा कामांचा समावेश आहे. बाजार समितीने काढलेल्या १०-१० दुकानांच्या गाळ्यातून १८ लाखांचे उत्पन्न मिळाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या बाजार समितीत शेतकèयांना वरदान ठरलेली धान्य, शेतमाल कर्ज तारण योजनाही राबविली जात आहे.

सध्या बाजार समितीने ५०० मेट्रिक टनाचे दोन गोदाम, दोन लिलाव शेड व सिमेंट काँक्रिट रस्ता, अशी एकूण पाच कोटींची कामे प्रस्तावित केली असून, त्यासाठी लागणारी २५ टक्के रक्कम आधीच शिल्लक करून ठेवली असल्याचे समजते. याशिवाय विरूर (स्टेशन) येथे उपबाजार समिती स्थापण्याचा मानस असून, यासाठी जमीन खरेदी करण्यासाठी १२ लाख रुपयांची तरतूद आहे.

समस्या : बाजार समितीचा व्यवहार रात्री उशिरापर्यंत चालत असल्याने कास्तकारांना रात्रीला मुक्काम करण्यासाठी शेतकरी निवारा केंद्राची गरज आहे. या केंद्राला भेडसावणारी मुख्य अडचण म्हणजे राजुरा तालुका आंध्र सीमेला लागून असल्याने महाराष्ट्र सरकारचा हमीभाव कमी झाला की, कास्तकार आपल्या मालाची विक्री करण्यासाठी सीमापार निघून जातो qकवा सीमेपलीकडील आलेल्या व्यापाèयांना माल विकून मोकळा होतो. याशिवाय अशा व्यापाèयांकडून कास्तकारांना नगदी रक्कम मिळते. याशिवाय सोयाबीनचे जास्तीत जास्त कास्तकार सावकारी पाशात अडकलेले असल्याने असे अनेक कास्तकार व्यापाèयांकडे qकवा सावकारी व्यवसाय करणाèयांकडे आपला माल देऊन मोकळे होतात.


प्रतिक्रिया :
२००८ मध्ये बाजार समितीचे सरासरी वार्षिक उत्पन्न १६ ते १८ लाख रुपयांपर्यंत होते. प्रशासकीय खर्च १५ लाखांवर आहे. त्यामुळे बाजार समितीला ङ्कारसा ङ्कायदा मिळत नव्हता. याशिवाय साडेचौदा लाख रुपयांचे कर्जही होते. मात्र, आम्ही या सर्व कठीण परिस्थितीतून मार्ग काढीत बाजार समितीला सुस्थितीत आणलेले आहे. पहिल्या वर्षी ३६ लाख, दुसèया वर्षी ४५ लाख व पुढे ५४ लाख रुपये व गेल्यावर्षी ७८ लाख रुपयांचे उत्पन्न बाजार समितीला मिळाले. कास्तकारांसाठी मुबलक सुविधा उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असून, सुमारे एक कोटी रुपयांची विकासकामे केलेली आहेत. पाच कोटी रुपयांची विकासकामे प्रस्तावित आहेत.

- प्रभाकर ढवस, सभापती

मागील वर्षीचे भाव

(सन १२-१३)

सोयाबीन - सरासरी भाव २१८० रुपये (किमान १८००- कमाल २९९५)

कापूस- सरासरी भाव ३८०२ रुपये ( किमान ३३००- कमाल ४४००)

तूर-सरासरी भाव २५३८ रुपये (किमान २१५०-कमाल ३२००)

चना- सरासरी भाव २२५४ रुपये (किमान १८००-कमाल ३२२५)




मागील वर्षीची आवक :

सोयाबीन : ५२ हजार ७२९ qक्वटल

तूर : १९१६ qक्वटल

कापूस : ४९ हजार २२७ qक्वटल

चना : १२०९ qक्वटल

------------------

बाजार समिती गोंडqपपरी

शेतमालाला योग्य भाव मिळविण्यासाठी गोंडqपपरीच्या बाजार समितीने राबविलेल्या तारण योजनेला यावेळी अपेक्षेपेक्षा मोठे यश मिळाले आहे. चालू सत्रात या योजनेच्या माध्यमातून १५६ शेतकèयांना ५२ लाख रुपयांचा ङ्कायदा मिळाला. विशेष म्हणजे जय श्रीराम धानाला २५५१ रुपये, तर एच.एम.टी धानाला २२०० रुपये एवढा भाव मिळाला.

पीक निघाल्यानंतर धानाला अत्यंत कमी भाव असतो. यामुळे व्यापारी याचा मोठा ङ्कायदा घेत असतात. अशात शेतकरीबांधवांचे अक्षरश: शोषण होते. यामुळे बाजार समितीची तारण योजना शेतकèयांच्या हिताची ठरली आहे.

गोंडqपपरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य मार्केट यार्डमध्ये शेतमाल तारण योजनेत यंदा १७६ शेतकèयांना लाभ मिळाला. यात १०७ शेतकèयांनी ४३०८ qक्वटल सोयाबीन पिकाचा माल तारणसाठी ठेवला होता. ४९ शेतकèयांनी २९६३ qक्वटल धान योजनेत ठेवले होते. या संपूर्ण शेतकरीबांधवांना ७५ टक्के अग्रिम रक्कम देण्यात आली. तारण योजनेत शेतमाल लिलाव झाल्याने सोयाबीनच्या पिकात १०७ शेतकèयांना प्रतिqक्वटल ६०० ते ७०० रुपये एवढा ङ्कायदा झाला. सोयाबीन मे. इंडियन सॉल्व्हंट प्रा. लि. राजनांदगाव यांना विक्री करण्यात आला. धानपिकामध्येही शेतकरीबांधवांना प्रतिqक्वटल ८०० ते ९०० रुपये एवढा जास्त ङ्कायदा मिळाला आहे. बाजार समितीच्या धान लिलावात गोंडqपपरी, चामोर्शी, गडचिरोली, मूल येथील व्यापाèयांनी धान खरेदी केलेला आहे. यामुळे जय श्रीराम धानाला २५५१ रुपये, तर एच.एम.टी धानाला २२०० रुपये एवढा भाव मिळाला. शेतातील सर्व उत्पादित मालाची खरेदी- विक्री मुख्य बाजार आवार गोंडqपपरी, उपबाजार आवार भंगाराम तळोधी येथे करण्यात येत आहे.




या सत्रातील जास्त शेतकèयांच्या सहभागाने, तसेच अवैध खरेदी- विक्रीवर नियंत्रण ठेवल्याने बाजार समितीच्या नफ्यामध्ये वाढ झालेली आहे. शेतकèयांनी मोठ्या प्रमाणावर या योजनेत सहभाग घेतल्याने त्यांना या सत्रात जवळपास ५२ लाख रुपयांचा ङ्कायदा झालेला आहे.

- जिनेद्र सोनटक्के, सचिव




बैलबाजाराने शेतकèयांना दिलासा

बाजार समितीच्या यार्डमध्ये दर गुरुवारी बैलबाजार भरतो. या बाजारात गडचिरोली जिल्ह्यासह आंध्र प्रदेशातील व्यापारी खरेदी- विक्रीसाठी येतात. बाहेरील बाजारामध्ये बैलांना योग्य qकमत मिळत नाही. शेतकèयांचे शोषण केले जाते. मात्र, त्यांना योग्य बाजारभाव मिळतो. बाजारात येणाèया शेतकèयांना पाच रुपयांत जेवण दिले जाते.




विविध उपक्रम

बाजार समितीच्या वतीने विविध अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहेत. गोंडqपपरी तालुक्यातील अनेक मतिमंद विद्याथ्र्यांना गणवेशाचे वितरण करण्यात आले. बैलबाजारातील बैलांचा विमा काढण्यात येत आहे. कांदा पिकाला बाजारभाव मिळावा, यासाठी कांदा चाळ उभारण्यात आलेली आहे. माल साठविण्यासाठी गोदामे बांधण्यात आलेली आहेत. तोहोगाव, भंगाराम तळोधी येथे स्वतंत्र उपबाजारपेठा उभारण्यात आलेल्या आहेत. येणाèया काही दिवसांत वढोली येथे बैलबाजार सुरू करण्याबाबत विचाराधीन आहे.




तारण योजनेकरिता बाजार समितीत गोदामाची जागा अपुरी पडत आहे. १००० मे. टनाच्या चार नवीन गोदामांचे बांधकाम करण्याचे समितीने ठरविले आहे. समितीच्या माध्यमातून येणाèया दिवसांत विविध लोकोपयोगी उपक्रम राबविण्याचा संकल्प आहे.

- राजीव चंदेल, सभापती बाजार समिती, गोंडqपपरी

-------------

मूल : धान उत्पादनासाठी जिल्ह्यात अग्रेसर मूल कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज हजारो qक्वटल धानाची आवक होऊन शेतकèयांना चढत्या दराने त्यांचा मोबदला मिळतो.

येथील बाजार समितीची स्थापना होऊन ४० वर्षे झालीत. या कालावधीत बाजार समितीमध्ये प्रशासकीय व्यवस्था पाहणाèया संचालक मंडळाने शेतकèयांच्या हिताचा विचार डोळ्यापुढे ठेवून अनेक विकासकामे केली आहेत. मागील पाच वर्षांपूर्वी सभापती राकेश रत्नावार यांच्या नेतृत्वातील संचालक मंडळाने कोट्यवधी रुपयांची विकासकामे केलीत. यात बाजार समिती परिसरात सिमेंट, काँक्रिट रस्ते, लिलाव शेड, उपाहारगृह, शेतकèयांसाठी थंड शुद्ध पाण्याची व्यवस्था, किसानभवन आदी कामे समाविष्ट आहेत. तालुक्यातील ग्रामीण भागातून येणाèया शेतकèयांना उत्पादनाचा योग्य मोबदला मिळावा, या दृष्टीने बाजार समिती प्रशासन नेहमी दक्षता घेत असते. त्यादृष्टीने व्यापाèयांच्या समस्या सोडविण्यास प्रशासनाने प्राधान्य दिले आहे. दुसरीकडे बाजार समिती प्रशासनाकडून व्यापारी, शेतकरी, अडते यांच्याही काही अपेक्षा आहेत. बाजार समिती प्रशासनाने धानमाल खरेदी करण्यास येणाèया व्यापाèयांसाठी सभागृहाची व्यवस्था करणे आवश्यक आहे.




अडते-शेतकरी हे बाजार समितीचे मुख्य घटक असून, त्यांच्या सहकार्यातूनच बाजार समितीचे कार्य सुरू आहे. बाजार समितीने बनविलेल्या विशेष आराखड्यात व्यापारी, अडत्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात येतील.

राकेश रत्नावार, सभापती




केवळ धानाच्या आवकेतून बाजार समितीला दरवर्षी कोट्यवधींचे उत्पन्न मिळते. २०१२-१३ या आर्थिक वर्षात २५ लाख qक्वटल मालाची आवक होऊन १५० कोटींची उलाढाल झाली. यातून बाजार समितीला दीड कोटींचे उत्पन्न झाले. मागील वर्षात एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत ५० कोटी रुपयांची उलाढाल झाली असून, बाजार समितीला ५० लाख रुपयांचे उत्पन्न झाले आहे.

- प्रवीण चेपूरवार, सहायक सचिव




बाजार समिती शेतकèयांच्या हिताच्या दृष्टीने अनेक विकासकामे करीत आहे. मात्र, शेतकèयांनी बाजार समितीत आणलेल्या मालाचे लवकरात लवकर लिलाव करून, व्यापाèयांनी मोजमाप करावे. शिवाय मालाचा मोबदला त्वरित मिळाला पाहिजे.

बापू रामटेके, शेतकरी, चिमढा




केंद्र आणि राज्य शासन निधीतून बाजार समितीमध्ये होणाèया विकासकामांचा शेतकरी, व्यापाèयांना लाभ होणार असला, तरी शेतकèयांचा माल त्वरित विकून रोख रक्कम मिळाली पाहिजे. सद्य:स्थितीत शेतकèयांना चांगला दर मिळत असला, तरी त्यांच्या उत्पादनखर्चाच्या तुलनेत कमीच आहे.

- मारोती चिताडे, अडते

-------------------------
ब्रह्मपुरी : येथील बाजार समितीच्या आवारात दर रविवारी मोठ्या प्रमाणात बैलबाजार भरविला जातो. बाजार समितीची वार्षिक उलाढाल ७५ ते ८० लाखांची आहे. समितीचा आवार दोन- तीन एकर जागेत प्रशस्त आहे. शासकीय व्यापारी संकुलाचे २० गाळे आहेत. समितीच्या आवारात लक्ष्मीनारायणचे मंदिर आहे. समितीच्या आवारात चार ते पाच धान्य गोदाम आहेत. खरेदी-विक्री संस्थेच्या माध्यमातून शेतकèयांच्या मालाची खरेदी- विक्री केली जाते. याच आवारात दररोज मटण मार्केट भरते.

अनेक दिवसांपासून समितीच्या आवारात धान व इतर मालाची बोली लावण्याची पद्धत बंद आहे. व्यापारी हा माल सरळ राइसमिलमध्ये नेतात. त्यामुळे शेतकèयांना योग्य मोबदला मिळत नाही.

बाजार समितीतील संचालक मंडळातील सदस्यसंख्या १८ असून, कर्मचारी ११ आहेत. चार शेतमाल तपासणी नाके आहेत.

बाजार समितीला सुरक्षाqभत आहे. व्यापारी संकुल हे बाजार समितीच्या निधीतून बांधण्यात आले. राष्ट्रीय कृषी निवारण योजनेतून पाच कोटींचे अनुदान मिळणार आहे. या शेतकरी व व्यापाèयांना खरेदीसाठी चाळ, गोदाम, रस्ते, सुरक्षाqभत, दिव्यांची व्यवस्था केली जाईल.

- केशव भुते, सभापती

--------------------
qसदेवाही : qसदेवाही येथे आठ एप्रिल १९६२ ला कृषी उत्पन्न बाजार समितीची निर्मिती करण्यात आली. परंतु, समितीकडून शेतकèयांसाठी कोणत्याही प्रकारच्या सुविधा नाहीत. बाजार समितीत धानाची आवक नसल्याचे दिसून आले. वर्षभरातून एकदाही या समितीमध्ये धानाची विक्री-खरेदी होते की नाही, याची माहिती देण्यास कुणी कर्मचारी तयार नव्हते.

qसदेवाही तालुका संपूर्ण जिल्ह्यात धानासाठी प्रसिद्ध आहे. जय श्रीराम, परभणी, क्रांती, जयप्रकाश सारख्या सुवासिक व उच्च प्रतीच्या धानाचे उत्पादन तालुक्यात होते. परंतु, वर्षभर राबणाèया या शेतकèयांच्या मालाला योग्य मोबदला मिळत नाही. बाजार समिती शेतकèयांसाठी काहीच करीत नसल्याने शेतकरी आपला माल खासगी व्यापाèयांना कमी किमतीत विकतात. काही शेतकरी तळोधी, मूल, ब्रह्मपुरी येथे जाऊन विक्री करतात.

विकासकामे
qसदेवाही बाजार समितीत नवरगाव आणि पळसगाव जाट ही दोन उपकेंद्रे आहेत. मागील वर्षी एक लाख ४० हजार खर्च करून सुरक्षाqभत व गोदाम बांधण्यात आले.

अपेक्षा 

धानाची विक्री व्हावी, शेतकèयांची व्यवस्था करावी, अडलेल्या शेतकèयांना अग्रीम रक्कम, शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योग, धान साठविण्यासाठी पुरेशी व्यवस्था हवी आहे.
समस्या : सुविधांचा अभाव असल्याने शेतकरी आपला माल येथे आणत नाहीत. त्यामुळे धानाचा लिलाव होत नाही. तारण योजना नाही.

माहिती देण्यास टाळाटाळ

बाजार समितीचे सभापती श्यामराव गहाणे यांच्याशी संपर्क साधला असता आपण बाहेरगावी असल्याने कोणतीही माहिती सांगू शकत नाही, असे सांगत त्यांनी भ्रमणध्वनी एक मिनिटात बंद केला.

--------

चिमूर : चिमूर तालुकानिर्मितीनंतर येथे १९८२ मध्ये स्थापन झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत रात्री उशिरापर्यंत मिरची, सोयाबीन आदी पिकांच्या खरेदी- विक्रीचे मोजमाप व्हायचे. परंतु, गेल्या पाच ते सात वर्षांत या बाजार समितीत कृषीमालाचा बाजारच भरत नाही. त्यामुळे शेतकèयांना मिळणाèया बोलीभावातून अधिकच्या रकमेपासून वंचित होऊन माल व्यापाèयांच्या घशात टाकला जात आहे. मात्र, दुसरीकडे बाजार समिती आजही नफ्यात असल्याचा सचिवासह संचालकाचा दावा आहे.

बाजार समितीत गेल्या पाच ते सात वर्षांपासून सोयाबीन, धान, कापूस, मिरची यांचा बाजार भरत नसून, अनेक व्यापारी, अडते, दलाल परस्पर शेतकèयांच्या घरी जाऊन खरेदी-विक्री करतात. त्यात शेतकèयांची बेभावपणे लूट होत आहे. मात्र, त्याकडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे दुर्लक्ष होत आहे.

चिमूर येथील मुख्य मार्केटमधील ओट्यावर शेड, एक गोदाम, बाजार ओटे व कार्यालय आहे. बाजारासाठी प्रशस्त जागा उपलब्ध आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे. परंतु, शेतकèयांना बाजारात आकर्षित करण्यास बाजार समिती संचालक मंडळ व अधिकारी कर्मचारी कमी पडत असल्याचे दिसून येते.

परंतु, कागदोपत्री या बाजार समितीत २०१२-१३ च्या आकडेवारीवर नजर मारल्यास सोयाबीन, धान, तूर आदींची एक लाख ३९ हजार १५७ qक्वटल आवक झाली, असे लक्षात येते. उत्पन्न ४३ लाख ७६ हजार ९५९ एवढे असून, वार्षिक खर्च ३५ लाख ८९ हजार ५९५ एवढे आहे. यात नङ्का ७ लाख ८७ हजार ३८७ रुपये झाला.

पाच कोटी ३४ लाख रुपयांचा कृषी विकास आराखडा प्रस्तावित करण्यात आला असून, त्यात नेरी, भिसी येथे अ‍ॅक्शन शेड, गोदाम व चिमूर मुख्य मार्केटमध्ये दोन नवीन गोदाम, अ‍ॅक्शन शेड, शेतकरी भवन, अंतर्गत रस्ते आदी कामे प्रस्तावित आहेत. बाजारभाव डिस्प्ले यंत्र मुख्य आवारात २४ तास सुरू असते. शेतमाल धान, चना, तूर व इतर शेतमालाची बाजार समितीत खरेदी- विक्री होत असते.

- श्री. ढोणे, सचिव, बाजार समिती

---

मुख्य मार्केट, नेरी व भिसी उपबाजार पेठ व जांभूळघाट नेरी व चिमूर येथे बैलबाजार यासह ७२ व्यापारी, ४२ अडते, १९ मापारी व ५१ हमाल आहेत.

------
शेतकèयांची प्रतिक्रिया
बाजार समितीत शेतमाल आला पाहिजे. शेतकèयांनी घरी माल विक्री करू नये. काही व्यापाèयांचे खासगी दलाल विनापरवान्याने शेतकèयांच्या घरी जाऊन कमी भावात शेतमालाची परस्पर खरेदी करतात. त्यामुळे शेतकèयांनी बाजार समितीतील जाहीर लिलावातच माल विकावा.
- अब्दुल शकील पटेल, शेडेगाव 

बाजार समिती ही शेतकरीविरोधी व व्यापारी हिताची आहे. जोपर्यंत शेतकरी प्रतिनिधी या बाजार समितीवर विराजमान होणार नाही, तोपर्यंत शेतकरी हिताचे निर्णय घेतले जाणार नाही. शेतकèयांच्या शेतमालाला योग्य भाव मिळवून त्याच्या श्रमाची qकमत मिळेल.
- अरुण लोहकरे, शेतकरी तथा तालुकाध्यक्ष
भाजप किसान आघाडी, चिमूर
१० ते १२ वर्षांपूर्वी बाजार समिती रात्री उशिरापर्यंत मिरची, सोयाबीन, धान आदी शेतमालाची मोजमाप करायची. तेव्हा शेतकèयांना त्यांच्या मालाची योग्य qकमत जाहीर लिलावाद्वारे मिळत असे. मात्र, आता बाजार समितीच्या शेतकरीविरोधी धोरणामुळे शेतमालाचा बाजारच भरत नाही. त्यामुळे शेतकèयांची लूट होते. शेतकèयांना बाजार समितीत शेतमाल आणण्याकरिता बाजार समितीने उपाययोजना करणे आवश्यक आहे.

नत्थूजी मसराम, शेतकरी




बाजार समितीचे संचालक मंडळ व्यापाèयांच्या वर्चस्वावर चालत असून, शेतकèयांची मोठी लूट होत आहे. त्यामुळे बाजार समितीने त्याकडे विशेष लक्ष देऊन शेतकèयांची वेदना समजून घ्यावी. मोठ्या प्रमाणात शेतमाल तालुक्याच्या बाहेर जाऊन इतर ठिकाणी, मार्केटमध्ये विकला जातो. परंतु, चिमूरच्या मार्केटला माल का येत नाही, हाही संशोधनाचा विषय आहे.

- केशवराव वरखेडे, मालेवाडी


कोरपना : राजुरा तालुक्यातून विभाजन झाल्यावर कोरपना येथे नोव्हेंबर २००३ रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना करण्यात आली. त्यात जिवती तालुक्याचाही समावेश करण्यात आला. येथील संचालक मंडळाचा कार्यकाळ १९ ऑक्टोबर २०१३ रोजी संपत असून, पुढील महिन्यात निवडणूक होणार आहे.

येथे सोयाबीन, कापूस, चना, बैलबाजार यातून समितीला वार्षिक २५ ते ३० लाख उत्पन्न मिळते.

या समितीची उपबाजारपेठ गडचांदूर येथे असून, बैलबाजार भरतो. समितीमाङ्र्कत गोदाम, लिलाव शेड, व्यापारी गाडे बांधण्यात आले. स्पर्धात्मक व्यापाèयांचा अभाव असल्याने शेतकèयांना भाव मिळत नाही. तालुक्यात कापूस हा मुख्य पीक आहे. परंतु, खरेदीदार व्यापारी नसल्याने शेतकèयांना आंध्र प्रदेशात मालाची विक्री करावी लागते.
कोरपना येथे ३.०२ हेक्टर, तर गडचांदूर येथे ५.९२ हे.आर. जागा समितीकडे उपलब्ध आहे. दोन्ही तालुक्यांतील ७५ हजार हे. जमिनीवर पिके घेतली जातात. मागील वर्षी कापूस १६८४० qक्वटल, सोयाबीन १७६८०qक्वटल, तूर १०८३२ qक्वटल, हरभरा २३८ qक्वटल माल विक्रीस आला होता. सध्या शेतकèयांचा माल उपलब्ध नसल्याने बाजारात शुकशुकाट आहे. शेतमाल साठवून ठेवण्याकरिता ५०० मेट्रिक टन क्षमता असलेले गोदाम येथे उपलब्ध आहे. ग्रामीण भागातून मार्केट यार्डपर्यंत शेतमालाची वाहतूक करण्यासाठी वाहनांची सुविधा अपुरी आहे. येथे बैलगाडी, पिकअप, मेटॅडोर, ट्रॅक्टर अशा वाहनांनी माल पोहोचविला जातो. बाजार समितीच्या संचालक मंडळाचे सभापती देवाजी हुलके असून, उपसभापती प्रल्हाद पवार व प्रभारी सचिव एस. बी. बेग आहेत. संचालक मंडळात एकूण १८ सदस्य आहेत. बाजार समितीचे पहिले सभापती होण्याचा मान सय्यद आबिद अली यांना मिळाला.

-------

  • या सुविधा हव्यात

  • - माहिती नोटीस बोर्ड/ इलेक्ट्रिक बोर्ड प्रदर्शन

  • - शेतमालाच्या दरांचे नोटीस बोर्ड

  • - उत्पादक नोटीस बोर्ड

  • - उपाहारगृह/ रेस्टॉरंट

  • - शौचालय

  • - अंतर्गत रस्ते

  • - पार्किंग

  • - कुंपण

  • - पत्रपेटी

  • -ङ्कळांची दुकाने

  • - अग्निशमन यंत्रणा

  • - शेतकèयांसाठी विश्रामगृह

  • - पिण्याचे शुद्ध व थंड पाणी 

  • - विद्युतीकरण

  • - लिलाव प्लॅटङ्कॉर्म

  • - प्रतवारी तपासणी प्रयोगशाळा

  • - कचराकुंडी

  • - माहिती युनिट

  • - विस्तार युनिट

  • - स्वयंचलित माहिती यंत्रणा

  • - बाजार कार्यालय इमारत

  • - उत्पादकांसाठी कल्याण योजना

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.