यवतमाळ- जिल्ह्यात एका दिवसात विविध ठिकाणी खुनाच्या तीन घटना घडल्याने जिल्हा पोलीस प्रशासन हादरले आहे. पुसद तालुक्यातील हर्शी गावात घडली. येथे संपत्तीच्या वादातून पोटच्या मुलाने आईचा खून केल्याची दुर्दैवी घटना घडली. भूखंडाच्या मालकीच्या वादावरून हा खून झाल्याचे पोलिसांनी सांगितले. दुसरी घटना मानपूर गावात घडली असून येथे एका तरुणाचे डोके ठेचून हत्या करण्यात आली आहे. तर तिसरी घटना जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात चिखली गावात घडली. येथे एका तरुणीचा खून करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुसद तालुक्यातील हर्शी गावात मंगळवारी संपत्तीच्या वादातून गजानन संभाजी वाडे (वय ३१) या तरुणाने त्याची आई सयाबाई वाडे (वय ६०) हिचा खून केला. आरोपी गजानन वाडेला एक भूखंड स्वतःच्या नावावर करून हवा होता. मात्र यावरून मुलगा आणि आईमध्ये वाद झाला. आरोपी गजानने तिक्ष्न हत्याराने भोसकल्याने तिची आई, सयाबाई वाडे हिचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी गजानन वाडेला अटक केली आहे. माणपूर गावात एका २५ वर्षाच्या तरुणाचा मृतदेह सापडल्याचे कळताच पोलीस पथकाने येथे धाव घेतली. परंतु मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत असल्याने त्याची ओळख मात्र पटू शकली नाही. याप्रकरणी अज्ञात व्यक्तिविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
तिसऱ्या घटनेत चिखली गावात लक्ष्मी भीमराव दाभे (२१) ही तरुणी सकाळी प्रातर्विधीसाठी घराबाहेर गेली होती. परंतु बराच वेळ ती घरी परत न आल्याने तिच्या कुटुंबियांनी शोध घेतला असता जवळच्या जंगलात तिचा मृतदेह मिळाला होता.