সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, September 05, 2013

चिमुकलीला वाचविताना आईचाही मृत्यू

नागपूर : पाण्यात बुडालेल्या आपल्या अडीच वर्षाच्या चिमुकलीला वाचविण्यासाठी उडी घेतलेल्या आईलाही आपला जीव गमवावा लागला. बुधवारी सायंकाळी ही हृदयद्रावक घटना बेलतरोडी येथील पृथ्वीराजनगरात घडली. या घटनेमुळे परिसरात शोक पसरला आहे.
सरिता नरेंद्रकुमार खांदेवाहे (२४) आणि अडीच वर्षाची रिता असे मृताचे नाव आहे. सरिता पती आणि मुलगी रितासोबत राहत होती. ती मूळची गोंदिया येथील रहिवासी आहे. पृथ्वीराजनगरात बोरकर यांच्या घरी ती राहत होती. बोरकर यांच्या घरासमोर कुंडलवार नावाच्या बिल्डरचा १0 हजार वर्गफुटाचा प्लॉट आहे. या प्लॉटवर इमारतीच्या बांधकामासाठी खड्डा खणण्यात आला आहे. खूप दिवसांपासून बांधकाम बंद असल्याने या खड्डय़ात पाणी साचले होते. बुधवारी दुपारी ४.३0 वाजता सरिता कपडे धुण्यासाठी कुंडलवार यांच्या प्लॉटजवळ गेली होती. प्रत्यक्षदश्रीनुसार मुलगी रिता सरिताच्या खड्डय़ाजवळ गेली. ती कपडे धुण्यात व्यस्त होती.
अचानक पाण्यात काहीतरी पडल्याचा आवाज झाला. सरिताने खड्डय़ाकडे पाहिले असता तिची मुलगीच खड्डय़ात पडल्याचे दिसले. क्षणाचाही विलंब न करता सरिताही खड्डय़ात उतरली. दोघींना पाण्यात बुडताना पाहून परिसरातील नागरिकांनी पोलिसांना सूचना दिली. हुडकेश्‍वर पोलीस लगेच घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या मदतीने पाऊण तासानंतर दोघींनाही बाहेर काढण्यात आले. तेव्हापर्यंत दोघींचाही मृत्यू झाला होता.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.