चंद्रपूर - येथील रामनगर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस उपनिरीक्षक नंदा वैश्य यांना कर्तव्यादरम्यान सहकार्य न करणार्या शिपायाची अखेर वाहतूक शाखेतून बदली करण्यात आली आहे. बल्लारपूरच्या नगराध्यक्ष रजनी मुलचंदानी यांच्यावाहनाने वैश्य यांच्या वाहनाला धडक दिली. यावरून मुलचंदानी व वैश्य यांच्यात शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर वैश्य यांनी मुलचंदानी यांचे वाहन पोलीस ठाण्यात लावण्याचे आदेश तेथे तैनात वाहतूक पोलीस शिपायी रमेश कोवे याला दिले. मात्र आदेशाचे पालन न करताना कोवे याने वैश्य यांनाच समजाविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशावरून वाहतूक शाखा निरीक्षक पुंडलिक सपकाळे यांनी या प्रकरणाची चौकशी केली. चौकशीदरम्यान रमेश कोवे दोषी आढळून आल्याने त्याची वाहतूक शाखेतून तातडीने उचलबांगडी करून त्याची पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आल्याची माहिती पुंडलिक सपकाळे यांनी दिली.
Sunday, September 15, 2013
Author: खबरबात
Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.
এ সম্পর্কিত আরও খবর
- ব্লগার মন্তব্
- ফেইসবুক মন্তব্য