घुग्घुस-शेतात पडलेल्या जिवंत विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने सुरेश दत्तूजी गोखरे (४७) रा. धानोरा शेतकर्याचा मृत्यू झाला. सुरेश गोखरे यांच्या शेतात वीज वितरण कंपनीच्या विद्युत वाहिनीचे जिवंत तार पडून आहेत. अनेक दिवसांपासून हे तार पडून असतानाही वीज वितरण कंपनीने त्याकडे लक्ष दिले नाही. दरम्यान आज अचानक सुरेश गोखरे यांचा शेतात काम करीत असताना तारेला स्पर्श झाला. यात त्यांचा मृत्यू झाला.
ट्रकच्या धडकेत पत्नी ठार, पती जखमी
वनसडी : भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने पत्नीचा जागीच मृत्यू तर पती जखमी झाल्याची घटना आज दुपारी ३.१५ वाजताच्या सुमारास नारंडा फाट्यावळ घडली. वनिता नत्थू गिरडकर (४५) रा. हेटी असे मृत पत्नीचे नाव आहे तर पती नत्थू गिरडकर (५0) हे जखमी आहेत. कोरपना तालुक्यातील हेटी येथील हे गिरडकर दाम्पत्य आज दुपारी गणपतीच्या जेवणाकरिता हेटीवरून अंतरगावकडे आपल्या दुचाकीने (क्रमांक एमएच ३४ एडी १६५२) जात होते. दरम्यान, मुरली अँग्रो सिमेंट कंपनीजवळील नारंडा फाट्याजवळ विरुध्द दिशेने येणार्या भरधाव ट्रकने (क्रमांक सीजी 0४ डीबी ७३१७) त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात वनिता गिरडकर यांचा जागीच मृत्यू झाला तर नत्थू गिरडकर हे गंभीररित्या जखमी झाले.
http://chandrapurnews.blogspot.in/