সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Tuesday, September 10, 2013

माना परिसरात बिबट जेरबंद

चंद्रपूर : माना परिसरात आज सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास एका मादी बिबट्याला जेरबंद करण्यात आले. तीन दिवसांपूर्वी या बिबट्याने या परिसरातील रोहीत बहुरिया या युवकावर हल्ला केला होता.
विशेष म्हणेजे लालपेठ वेकोलि क्षेत्रातून तीन महिन्यांपूर्वी याच बिबट्याला वनविभागाने पकडले होते. त्यानंतर त्याच्या शरीरात कॉलर आयडीचे रोपण करून त्याला १२५ किलोमीटर अंतरावरील दूरवरच्या जंगलात सोडले होते. एवढे होऊनही हे अंतर पार करून ही मादी बिबट पुन्हा याच परिसरात परतली. आज सायंकाळी तिला पिंजर्‍यात पकडल्यावर कॉलर आयडी युनिटवर तपासणी केली असता ही बाब स्पष्ट झाली.
लालपेठ कॉलरीच्या माना परिसरात गेल्या वर्षभरात सहा व्यक्तींवर बिबट्यांनी हल्ला केला होता. यामुळे येथील नागरिकांमध्ये वनविभागाविरोधात प्रचंड रोष निर्माण झाला होता. त्यानंतर या परिसरात पिंजरे लावून वनविभागाने काही महिन्यांपूर्वीच तीन बिबट्यांना पकडले होते. तीन महिन्यांपूर्वीच एका मादी बिबट्याला वनविभागाने पकडले होते. त्यानंतर त्यावर १३५२५ क्रमांकाची कॉलर आयडी लावून मोहर्लीच्या जंगलात सोडले होते. आज पिंजर्‍यात सापडलेला बिबट याच क्रमांकाचा आहे. त्यावरून तो पुन्हा या परिसरात दाखल झाला होता, हे स्पष्ट झाले आहे.
दोन दिवसांपूर्वी एका युवकावर हल्ला केल्यांतर याच बिबट्याने या परिसरातील एक बकरी मारली होती. ती खाण्यासाठी तो आज सायंकाळी पुन्हा या परिसरात आला होता. दरम्यान त्याला पकडण्यासाठी केवळ पंधरा मिनीटांपूर्वीच वनविभागाने पिंजरे लावले होते. विशेष म्हणजे अवघ्या पंधरा मिनीटातच ही मादी बिबट पिंजर्‍यात अडकली. त्यामुळे वनाधिकार्‍यांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला.
चंद्रपूर वनवृत्ताचे मुख्य वनसरंक्षक संजय ठाकरे, चंद्रपूर वनविभागाचे सहायक वनसंरक्षक राजू पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी एस.एस. शिंदे, इको-प्रोचे बंडू धोतरे आदींनी ही मोहीम फत्ते केली. सध्या या बिबट्याला रामबाग नर्सरीत ठेवण्यात आले आहे. एक्दोन दिवसातच त्यासंदर्भात निर्णय घेतला जाणार असल्याचे पवार यांनी 'लोकमत'ला सांगितले.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.