সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, September 05, 2013

सहायक पोलीस निरीक्षकाची आत्महत्या

  • चंद्रपूर : येथील अतिरिक्त पोलीस अधीक्षकांच्या बंगल्यावर सेवारत असलेले सहायक पोलीस निरीक्षक मंगल किटे यांचा आज संशयास्पदरीत्या मृत्यू झाला. 
  • तुकूम परिसरातील पोलीस वसाहतीमध्ये ते वास्तव्याला होते. आज सकाळी ५.३0 वाजताच्या सुमारास त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याचे लक्षात आले. त्यामुळे अत्यवस्थ असलेल्या किटे यांना शेजारच्या मंडळींनी खासगी रुग्णालयात व त्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांना उपचारासाठी नागपूरला नेण्याचा सल्ला देण्यात आल्याने नागपूरला जात असतानाच वाटेत साडेतीन वाजताच्या सुमारास त्यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूचे कारण आत्महत्या असल्याचे सांगितले जात आहे. सकाळी ९ वाजताच्या दरम्यान त्यांनी विष घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे काही वेळातच ते अत्यवस्थ झाले. हा प्रकार काही वेळाने शेजार्‍यांच्या लक्षात आला. त्यामुळे शेजार्‍यांनीच त्यांना रुग्णालयात दाखले केल्याची माहिती आहे. गतवर्षी त्यांच्या मुलीचा विवाह झाला होता. 
  • नवृत्तीला चार-पाच वर्षे शिल्लक होते, अशीही माहिती आहे. त्यांच्या मृत्यूचे कारण दडविण्याचा प्रयत्न आज दिवसभर पोलिसांकडून सुरू होता. मात्र हा प्रकार आत्मत्येचा असल्याची माहिती आहे. आहे.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.