সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, September 08, 2013

जिल्ह्यात पर्यटनस्थळांची उपेक्षा

चंद्रपूर- निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात तब्बल ७६ तीर्थस्थळं आणि १६ पर्यटनस्थळं आहेत. मात्र त्यांच्या विकासाबद्दल शासन गंभीर नाही. केवळ पर्यटनस्थळ आणि तीर्थस्थळांचा दर्जा देऊन शासन मोकळे झाले आहे. पर्यटनाला वाव असलेल्या या जिल्ह्यात पर्यटनस्थळांची उपेक्षा होत आहे. या स्थळांच्या विकासासाठी केवळ तीन कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यातही विकास किती झाला, याकडे लक्ष द्यायला कुणालाही वेळ नाही. ताडोबा-मोहर्ली, भद्रावती शहर आणि चिमूर येथील प्रादेशिक पर्यटनस्थळांच्या विकासासह महाकाली मंदिर, मागिणकड किल्ल्याच्या विकासासाठी प्रत्येकी ४0 लाख रुपयांची विकास कामे सुरु करण्यात आली आहेत. मूल तालुक्यातील सोमनाथ येथील पर्यटनस्थळाच्या विकासासाठी मोठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. 
चंद्रपूर शहरात असलेल्या महाकाली मंदिरात माता महाकालीच्या दर्शनासाठी विदर्भ, मराठवाड्यासह आंध्र प्रदेशातील भाविकही मोठय़ा संख्येने येतात. त्यामुळे या स्थळाच्या विकासासाठी शासनाने ४0 लक्ष रुपयांची तरतूद केली आहे. यातून विविध विकास कामे करण्यात आले आहेत. 
येथील माता महाकालीची चैत्र महिन्यातील यात्रा प्रसिध्द असून या यात्रेसाठी लाखो भाविक येथे येतात. मात्र पर्यटक आणि भाविकांची संख्या लक्षात घेतल्यास येथील विकासकामे नगण्य ठरत आहेत. तब्बल एक महिना येथे यात्रा भरते. मात्र पर्यटकांच्या संख्येच्या तुलनेत येथील सुविधा कमी पडत आहे. 
वाघांसाठी प्रसिद्ध असलेल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात दररोज हजारो पर्यटक भेट देतात. त्यामुळे ताडोबा-मोहुर्ली पर्यटनस्थळाचा विकास करणे अपेक्षित आहे. त्यादृष्टीने येथे सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असल्या तरी, त्या कमीच आहेत. ब वर्गामध्ये असलेल्या मूल तालुक्यातील सोमनाथ येथील पर्यटनस्थळाच्या विकासासाठी १५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. येथे थोर समाजसेवक बाबा आमटे यांचा प्रकल्प आहे. त्यामुळे येथे भेट देणार्‍यांची संख्या मोठी आहे. जिल्ह्यातील माणिकगड किल्लाही प्रसिध्द आहे. या किल्ल्याच्या दुरुस्तीचे काम सुरु आहे. इतर ठिकाणच्या तुलनेत पर्यटकांची संख्या येथे कमी असली तरी, सिमेट कंपन्या आणि पहाडावरील भाग म्हणून येथे पर्यटनासाठी नागरिक जातात. येथे कोणत्याही सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या नसल्याने हे पर्यटन स्थळ केवळ नावापूरतेच र्मयादित आहे.
नागभीड तालुक्यातील घोडाझरी, सावली तालुक्यातील आसोलामेंढा, चिमूर तालुक्यातील गोंदेडा गुफा येथे वर्षभर पर्यटक भेटी देत असतात. घोडाझरीसाठी १७ लाख रुपयांची विकास कामे या आर्थिक वर्षात करण्यात आली आहेत. चंद्रपूर शहराच्या अगदी जवळ असलेल्या जुनोना तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी प्रथमच १३ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली. त्यानंतर आणखी १४ लाख रुपये वाढवून देण्यात आले असून २७ लाख रुपयांच्या विकास कामाला सुरुवात झाली आहे. मात्र जुनोना तलाव परिसर दुर्लक्षित आहे. हा परिसर अतिक्रमणाच्या विळख्यात असून येथे पर्यटन विकासाची कोणतीच चिन्हे दिसत नाहीत. याशिवाय जिल्ह्यात ७६ तिर्थस्थळ आहेत. त्याच्या विकासासाठी दीड कोटी रुपयांचे नियोजन आहे.

१) महाकाली मंदीर २) सोमनाथ (ता.मुल)
'क' वर्गातील पर्यटनस्थळ
रामाळा तलाव, ताडोबा- मोहर्ली, डोंगरगाव खडी, जुनोना, आसोलामेंढा, घोडाझरी, माणिकगड किल्ला, रायजिंग योगा इंटरनॅशनल मेडिटेशन र्झिाट अँड टुरीझम सेंटर जमनागड, झरपट नदी सौंयर्दीकरण, कोलासूर किल्ला, तपोभूमी किल्ला, तपोभूमी गोंदेडा, बालाजी देवस्थान, सात बहिणी डोंगर सोनापूर  

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.