সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, September 05, 2013

आयुक्त, महापौरांच्या वाहनांवरील अंबर दिवे उतरले

चंद्रपूर : मंत्री आणि अधिकार्‍यांच्या शासकीय वाहनांवरील अंबर दिव्यासंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार गृहमंत्रालयाने अध्यादेश काढला. त्याची अंमलबजावणी करीत मनपाचे आयुक्त आणि महापौरांच्या वाहनांवरील अंबर दिवे काढण्यात आले. याच आदेशानुसार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांच्या वाहनावरील अंबर दिवा काढण्याच्या सूचनाही देण्यात आल्याची माहिती आहे. 

       ‘क ‘ आणि ‘ड’ संवर्गातील महानगरपालिकाच्या आयुक्त आणि महापौर यांच्या वाहनांवर लाल दिवे काढण्यात येणार आहेत. या आदेशामुळे आता महापौर आणि आयुक्तांना त्यांच्या वाहनांवर लाल आणि अंबर दिवे लावता येणार नाहीत.
शासनाकडून काढण्यात आलेला हा अध्यादेश राज्यातील २६ महानगर पालिकांपैकी ‘क ‘ आणि ‘ड’ संवर्गातील महानगरपालिकांसाठी लागू असणार आहे. त्यानुसार राज्यातील २६ महानगरपालिकांपैकी ‘अ’ संवर्गात मुंबई महानगरपालिका तर ‘ब’ वर्गात पुणे आणि नागपूर महापालिकेचा समावेश होत असल्याने येथील महापौर व आयुक्तांना हा नियम लागू नाही. त्यामुळे त्यांना मात्र आपल्या वाहनावर लाल, अंबर दिवे लावता येणार आहेत.
      मात्र राज्यातील उर्वरित २३ महानगरपालिकांतील आयुक्त व महापौरांना अश्या पद्धतीने दिवे लावता येणार नाहीत. विशेष म्हणजे दिवे न लावनाऱ्यांच्या यादीमध्ये विविध विद्यापीठाचे कुलगुरू, विविध महामंडळाचे अध्यक्ष आणि जिल्हा व सत्र न्यायाधीशांनाही वगळण्यात आले आहे.
कोणत्या अधिकार्‍यांच्या आणि मंत्रीगटातील सदस्यंच्या वाहनावर कसा अंबर दिवा असेल या संदर्भात अलिकडेच सर्वोच्च न्यायालयाने आचरसंहिता जाहीर केली आहे. या संदर्भात गृह (परिवहन) विभागाने केंद्रीय मोटार वाहन कायदा-१९८९ च्या नियम १0८ मधील उपकलम एक नुसार या पूर्वीचे सर्व आदेश रद्दबादल ठरवित नव्याने आदेश जारी केले आहेत. त्या नुसार फक्त 'अ' आणि 'ब' गटातील महानगर पालिकांच्या महापौर आणि आयुक्तांनाच अंबर दिवा लावण्याचे अधिकार बहाल करण्यात आले आहेत. चंद्रपूर महानगर पालिका 'ड' वर्गात असल्याने संबंधिताना अंबर दिव्यापासून वंचीत राहावे लागणार आहे. या संदर्भात मनपा आयुक्त प्रकाश बोखड यांना विचारणा केली असता, अधिसूचना मिळाली असल्याचे सांगून त्यांनी त्याची अंमलबजावणी केल्याची माहिती दिली.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.