সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, September 12, 2013

कृषी विद्यापीठासाठी सिंदेवाहीत सर्वपक्षीय मोर्चा

सिंदेवाही : सिंदेवाहीत कृषी विद्यापीठाची स्थापना, ग्रामपंचायतीला नगर पंचायतीचा दर्जा, महसूलचे विभागीय कार्यालय सिंदेवाही तालुक्यासाठी चिमूरऐवजी ब्रह्मपुरी येथे सुरू करावे, तालुक्याच्या औद्योगिक विकासाला गती द्यावी, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बफर झोनमधील गावच्या आदिवासींना कमी दरात बांबू उपलब्ध करून द्यावा आदी मागण्यांच्या पूर्ततेसाठी आज सिंदेवाहीत सर्व पक्षीय मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व जि.प. सदस्य संदीप गड्डमवार यांनी केले.

समाज मंदिरातून निघालेल्या मोर्चात तालुक्यातील ५२ गावांचे सरपंच - उपसरपंच, सदस्य, सर्व राजकीय पक्षाचे नेते, कार्यकर्ते, व्यापारी संघटना, पत्रकार संघ, किसान महासंघ आदी पक्ष व संघटनांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. गावाच्या मध्यवर्ती भागातून निघून मोर्चाचे तहसील कार्यालयाच्या पटांगणात सभेत रूपांतर झाले. यावेळी जि.प. उपाध्यक्ष संदीप गड्डमवार, पं.स. सभापती अरविंद जैस्वाल, उपसभापती रमाकांत लोधे, माजी पं.स. सदस्य बाबुराव गेडाम, भाजपाचे जि.प. सदस्य नागराज गेडाम, भारिपचे किशोर साखरे, राष्ट्रवादीचे श्रीधर लोधे, तालुका सरपंच संघटनेचे सचिव बाबुलाल डांगे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष रमेश बिसेन यांनी मोर्चाला संबोधित केले. संदीप गड्डमवार यांनी न्याय्य मागण्यांसाठी भविष्यात तीव्र आंदोलन करण्याचा मानस व्यक्त करून जनतेला मागण्यांसाठी रस्त्यावर येण्याची विनंती केली. संदीप गड्डमवार, अरविंद जैस्वाल, रमेश बिसेन, बाबुराव गेडाम, रमाकांत लोधे, बाबुराव परसावार, नागराज गेडाम,अनिल उट्टलवार, राहुल पटेल, नागराज मेश्राम, दिलीप लोडेल्लीवार, राजू शेख, गंगाधर भैसारे, सरपंच रवींद्र नैताम, योगेश बोरकुंडवार, दामोधर नन्नावार यांच्या शिष्टमंडळाने तहसिलदार कुमावत यांना निवेदन सादर केले. 

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.