अनेक मासे अडकणार
|
धान्याची अफरातफर: सहकारी संस्थेच्या अध्यक्षासह चौघांना अटक
|
चिमूर: शासकीय गोदामातील स्वस्त धान्य दुकानदारांना अडीच रुपये किलो दर असलेला १२0 क्विंटल तांदूळ चिमूर येथील सौदागर यांच्या गोदामात उतरविताना चिमूर पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईत ट्रकचालकासह, गोदामकिपर, स्वस्त धान्य दुकानाचा संचालक व माल विकत घेणार्याला रंगेहात पकडून अटक करण्यात आली. नामदेव हिवरकर, गजानन लोणकर, फारुख गुलाम शेख सौदागर, भगवान तुकाराम राखडे अशी आरोपींची नावे आहेत.
आरोपीमध्ये चिमूर विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष नामदेव हिवरकर यांचा समावेश आहे. अशा पद्धतीने शासकीय धान्याची नियमीत अफरातफर केली जात असावी, अशी शंका आता व्यक्त केली जात आहे. शासकीय गोदामातून शासकीय मालाची अफरातफर होत असताना प्रशासकीय अधिकार्यांनी मौन पाळले असल्याने हा प्रकार अधिकारी कर्मचार्यांच्या संगनमताने होत असावा, अशी चर्चा आहे. गोरगरीबांना स्वस्त दरात धान्याचा पुरवठा व्हावा, यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. परंतु या धान्याचे लार्भार्थ्यांना वितरण न करता ते मोठ्या व्यापार्यांना विकल्या जात आहे. असाच प्रकार चिमूर पोलिसांच्या सतर्कतेने आज उघड झाला. संबंधित अधिकार्यांशी हात मिळवणी करून होत असलेल्या आर्थिक व्यवहारामुळे या विषयात कोणतीही कारवाई केली जात नाही. आज चिमुरात भरदिवसा शासकीय गोदामातील धान्य व्यापार्याच्या खासगी गोदामात उतरविण्याचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे उधळून लावण्यात आला. शासकीय गोदामातील धान्य खासगी गोदामात उतरविला जात असल्याची गोपनिय माहिती ठाणेदार हेमंत खराबे यांना मिळाली. त्यांच्या सूचनेवरून पोलीस उपनिरीक्षक ठाकरे ताफ्यासह सौदागर यांच्या गोदामाजवळ पोहचले. यावेळी शासकीय धान्याची अफरातफर होत असल्याचे दिसताच, त्यांनी ट्रकचालकासह सर्वांना आपल्या ताब्यात घेतले. एकूण तांदळापैकी ८0 कट्टे तांदूळ खासगी गोदामात उतरविण्यात आले होते. तो मालही पोलिसांनी जप्त केला आहे. या कारवाईमुळे तालुक्यातील संबंधित विभागाच्या अधिकार्यांचे धाबे दणाणले आहे. या प्रकरणात आणखी कुणाचा सहभाग आहे, याचा तपास पोलीस करीत आहेत. चिमूर विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष नामदेव नारायण हिवरकर यांना यापूर्वी असाच अफरातफरीचा प्रकार करताना गिरड पोलिसांनी रंगेहाथ पकडले होते, हे विशेष. आरोपी नामदेव हिवरकर, गजानन लोणकर, फारुख गुलाम शेख सौदागर, भगवान तुकाराम राखडे यांच्यावर जीवनावश्यक वस्तू कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. (तालुका प्रतिनिधी) अनेक मासे अडकणार शासकीय गोदामातील धान्य खासगी गोदामात उतरवित असताना पोलिसांनी धाड टाकून कारवाई केली. यात विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या अध्यक्षासह चौघांना पोलिसांनी अटक केली. या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येणार असून यापूर्वीही अशा प्रकारे धान्याची अफरातफर झाली काय, हेदेखील तपासाचा विषय ठरणार आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी काही मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. |
Saturday, September 28, 2013
Author: खबरबात
Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.
এ সম্পর্কিত আরও খবর
- ব্লগার মন্তব্
- ফেইসবুক মন্তব্য