সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Saturday, September 14, 2013

मृतदेह तब्बल १७ तास चिरघरात

नागभीड : दोन डॉक्टरांच्या वादात त्या महिलेचा मृतदेह तब्बल १७ तास येथील चिरघरात पडून राहिला. पण कोणीच शवविच्छेदन करायला पुढे येत नव्हते. शेवटी चिमूरचे आमदार विजय वडेट्टीवार ग्रामीण रुग्णालयात जावून डॉक्टरांना जेव्हा फाईलवर घेतले तेव्हा कुठे त्या वृद्ध महिलेचे शवविच्छेदन पार पडले.
यासंदर्भात प्राप्त माहितीनुसार, काल (दि. १२) रात्री ८ च्या सुमारास तुकुम येथील जमनाबाई जयदास बनकर या ६५ वर्षीय महिलेचा अपघातात जागीच मृत्यू झाला. लागलीच तिला येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. ती मृत असल्याचे घोषित झाल्यानंतर सकाळी ८ वाजता शवविच्छेदन करण्यात येईल, असे नातेवाईकांना सांगण्यात आले. आज सकाळी नातेवाईक पुन्हा ग्रामीण रुग्णालयात आले आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. गणेश पेणकर यांचेकडे त्वरित शवविच्छेदन करणार आहेत, असे उत्तर देवून डॉ. पेणकर यांनी आपले हात झटकले.
डॉ. पेणकर यांनी शवविच्छेदनाची जबाबदारी डॉ. काळे यांचेवर ढकलली असली तरी डॉ. काळेसुद्धा शवविच्छेदनासाठी आले नाहीत. रात्री ९ वाजता येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केलेल्या मृतदेहाच्या दुसर्‍या दिवशी १२ वाजेपर्यंत शवविच्छेदन करण्यात आले नाही, अशी माहिती चिमूरचे आमदार विजय वडेट्टीवार यांना कार्यकर्त्यांकडून देण्यात आली. 
लगेच आमदार वडेट्टीवार यांनी ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली आणि उपस्थित डॉक्टरांना शवविच्छेदनास का विलंब होत आहे याचा जाब विचारला. तेव्हा उपस्थित डॉ. पेणकर यांनी हे शवविच्छेदन डॉ. काळे यांना करण्यास सुचना दिली असल्याचे सांगितले. पण या वेळी डॉ. काळे हे रुग्णालयात हजरच नव्हते. दरम्यान, आमदार विजय वडेट्टीवार यांनी या प्रकाराचा आरोग्य उपसंचालकाकडे तक्रार करून दोन्ही डॉक्टरांवर कारवाईची मागणी केली. शेवटी आरोग्य उपसंचालक आणि आमदार विजय वडेट्टीवार डॉक्टरांची कानउघाडणी केल्यानंतर २ वाजता त्या महिलेचे शवविच्छेदन पार पडले.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.