आदर्श शिक्षकांमध्ये प्रदीप घोरपडे, धमानी यांची निवड
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीकडून २0१२-१३ या वर्षाचे विविध पुरस्कार आज जाहीर करण्यात ंआले. आदर्श समाजभूषण पुरस्कार माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शांताराम पोटदुखे यांना जाहीर झाला आहे.
तर आदर्श प्राचार्य पुरस्कार सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूरचे प्राचार्य डॉ. जे. ए. शेख यांना जाहीर झाला आहे. आदर्श शिक्षक पुरस्कार नेवजाबाई हितकारणी महाविद्यालय ब्रम्हपूरीचे डॉ. अमीर ए. धमानी, शिवाजी महाविद्यालय गडचिरोलीचे डॉ. प्रदीप घोरपडे यांना जाहीर झाला आहे. आदर्श विद्यापीठ पुरस्कार (अधिकारी वर्ग-१) मनिष झोडपे, आदर्श विद्यापीठ पुरस्कार (अधिकारी वर्ग-२) राजेंद्र पांडूरंग पाठक, आदर्श विद्यापीठ पुरस्कार (कर्मचारी वर्ग-३), देवेंद्र मेo्राम आदर्श विद्यापीठ पुरस्कार (कर्मचारी वर्ग-४), भिमराव उराडे आदर्श शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार मोहन वनकर तर आदर्श विद्यार्थी पुरस्कार संतोष छबीलदास सुरपाम यांना जाहीर झाला आहे. डॉ. प्रदीप घोरपडे हे शिवाजी महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेचे प्रमुख असून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीवरही त्यांनी काम केले आहे. या पुरस्काराचे वितरण २ ऑक्टोंबर रोजी विद्यापीठाच्या द्वितीय वर्धापन दिनाला केले जाणार आहे, अशी माहिती गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विनायक इरपाते यांनी दिली आहे.