সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Saturday, September 14, 2013

बातम्या

राजुरा येथे रेल्वेने कटून मजुराचा मृत्यू

राजुरा : राजुरा येथील रेल्वे ट्रॅकवर लाकडी रॅकसाठी काम करताना येथील बंडू आत्राम (२४) या मजुराचा रेल्वेने कटून जागीच मृत्यू झाला. राजुरा शहरातील रेल्वे सायडींगवर जेव्हा गाडी येते, तेव्हा डबे कमी आणि रेल्वेमधील लाकडे खाली करणार्‍या मजुरांची संख्या अधिक असते. आज सकाळी रेल्वेगाडी राजुरा येथे आल्यानंतर डबा पकडण्यासाठी मजूर गाडीसोबत धावू लागले. त्यातील बंडू आत्राम हा डबा पकडण्यासाठी चालत्या गाडीवर चढला. त्यातच रेल्वेखालीपडून त्याचा मृत्यू झाला.




विद्यार्थ्याने शाळेतच विष घेतले
सावली- गावातील एका व्यावसायिकाने चोरीचा आळ घेतल्याने भितीपोटी एका विद्यार्थ्याने शाळेतच विष प्राशन केले. ही घटना आज दुपारी येथील विश्‍वशांती कनिष्ठ महाविद्यालयात घडली. मनोज पत्रुजी चिताडे असे विष प्राशन करणार्‍या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो ११ व्या वर्गाचा विद्यार्थी आहे. विष प्राशन केल्यानंतर त्याची प्रकृती गंभीर बनल्याने त्याला तातडीने गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले.

पत्नीच्या खूनप्रकरणी जन्मठेप
चंद्रपूर : पत्नीचा गळा दाबून खून केल्याप्रकरणी येथील जिल्हा सत्र न्यायाधिश ए.एस.भैसारे यांनी आरोपी रतन शिवप्रसाद शर्मा याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
स्थानिक क्रिष्णनगर परिसरातील रहिवासी रतन शर्मा याचा विवाह चामोर्शी (जि.गडचिरोली) येथील सुभाष सुबोध मुखर्जी यांच्या मुलीशी झाला होता. मात्र लग्नानंतर पसंत नसल्याच्या कारणावरून रतनने तिचा छळ सुरू केला. तुझ्या वडिलांनी लग्नात हुंडा दिला नाही. त्यामुळे तू या घरात रहायचे नाही. अन्यथा तुझा खून करून टाकीन अशा धमक्या रतन शर्मा देत असे. यादरम्यान रतनने तिचा गळा दाबून खून केला व कुलरचा शॉक लागून मृत्यू झाल्याचा देखावा निर्माण केला. याबाबत तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी आरोपी रतन शर्मा याच्याविरुद्ध भादंवि ३0२, २0१ अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. या प्रकरणाचा तपास तत्कालिन सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेशपारधी यांनी करून न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले. सुनावणी दरम्यान न्यायालयाने साक्षीदारांची तपासणी केली. योग्य पुराव्याच्याआधारे आरोपी रतन शर्मा याला खून केल्याच्या आरोपाखाली जन्मठेप व एक हजार रुपयांचा दंड ठोठावला. तसेच भादंवि २0१ अन्वये तीन वर्षांची शिक्षा व५00 रुपयांचा दंडाची शिक्षा ठोठावली. या खटल्यात सरकारतर्फे अँड.जयंत साळवे यांनी काम पाहीले.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.