সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Monday, September 16, 2013

आर्थिक समीकरणांभोवती फिरू लागली वैद्यकिय सेवा

ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांचे मत 

पुणे - खासगी डॉक्टरांनी येणार्‍या रूग्णांची आत्मीयतेने काळजी घेतल्यास अथवा त्यांच्यावर उचित उपचार केल्यास डॉक्टर आणि रूग्णालयांवर होणार्‍या हल्ल्यांचे प्रमाण निश्‍चितच कमी होईल. मात्र, त्याकडे डॉक्टरांचा कल राहिलेला नसूून आर्थिक समीकरणांभोवती वैद्यकिय सेवा फिरू लागली असल्याचे मत  ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांनी एका मुलाखतीच्या दरम्यान व्यक्त केले .
कांतीलाल प्रतिष्ठान आयोजित महागणपतीच्या दर्शनाला आलेल्या आमटे दाम्पत्याच्या प्रकट मुलाखतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आकाशात चमकणार्‍या विजा आणि पर्जन्यधारा सुरू असतानाही आमटे यांच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. अनुपमा ताकमोघे यांनी ओघवत्या शब्दात उपस्थित केलेल्या प्रश्‍नांना आमटे दाम्पत्यांनी दिलखुलास उत्तरे दिली.
आमटे यांनी सरकारी आणि खासगी डॉक्टरांच्या कार्यपद्धतीवरही तीव्र नापसंती व्यक्त केली. यावेळी ते म्हणाले, ग्रामीण भागात सेवा देणार्‍या डॉक्टरांना गलेलठ्ठ पगार हवा असतो. त्या मोबदल्याच्या १० टक्के जरी त्यांनी रूग्णसेवा दिल्यास ग्रामीण आणि विशेषत: आदिवासी भागातील रोगराई दूर होईल, शिवाय विविध आजारांवर वेळीच उपचार झाल्यास त्यांना प्राणाला मुकावे लागणार नाही.
प्राण्यांना बदनाम करण्याचा मानवी स्वभाव असला, तरी माणूसच खर्‍या अर्थाने प्राण्यांपेक्षा हिंस्त्रपणे वागू लागला आहे. त्या दोन पायांच्या प्राण्यांनीच नरेंद्र दाभोळकरांची हत्या केली आहे,

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.