जनसंवाद विद्या विभागात रंगली "वेगळा विदर्भ हवा की नको?' वादविवाद स्पर्धा
चंद्रपूर - विदर्भ वेगळा होईल तर लगेच सारे प्रश्न मिटतील, या भ्रमात कुणीही राहू नये. पण संयुक्त महाराष्ट्रात राहूनही या भूमीचा विकास होणे नाही, हेही तेवढेच खरे. तेव्हा वेगळ्या विदर्भाची मागणी करताना केवळ ऐतिहासिक अभिनिवेश बाळगून qकवा भावनिक होऊन चालणार नाही. तर तात्विकद्दष्ट्या ही मागणी लावून धरली पाहिजे. या वैदर्भीय मातीची माणसंच या विदर्भाचे चांगले वाईट ठरवू शकतात, असे प्रतिपादन संपादक शैलेश पांडे यांनी येथे केले.
येथील सरदार पटेल महाविद्यालयाच्या जनसंवाद विद्या विभागातर्फे शनिवारी (१४ सप्टेंबर) गोंडवाना विद्यापीठस्तरीय वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ‘वेगळा विदर्भ हवा की नकोङ्क हा या स्पर्धेचा विषय होता. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील अनेक महाविद्यालयांच्या विद्याथ्र्यांनी या स्पर्धेत उत्स्फूर्तपणे भाग घेतला. स्पर्धेच्या बक्षिस वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी सर्वोदय शिक्षण मंडळाचे सचिव भरत पोटदुखे, तर मंचावर शैलेश पांडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. ए. शेख, उपप्राचार्य डॉ. एल. व्हि. शेंडे, प्रा. पंकज मोहरील प्रभृती उपस्थित होते.
पांडे पुढे म्हणाले, विदर्भ तेव्हाच वेगळा होईल, जेव्हा ती राजकीय गरज आहे असे पुढाèयांना वाटेल. तत्कालीन काळात संयुक्त महाराष्ट्र राजकीय गरज ठरली होती म्हणून महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. विदर्भात तशी वेळ येईल तेव्हा ही मागणी खèया अथाने व्यापक स्वरुप घेईल. विदर्भाचा इतिहास बघितला, तर हा परिसर कधीही महाराष्ट्राचा भाग राहिला नाही. साध्या तालुक्याची मागणी होत असताना त्या परिसराचा विकास होणे, हेच अपेक्षित असते. अगदी गोंडवाना विद्यापीठाची मागणी झाली आणि हे विद्यापीठ झाले म्हणून या परिसरातील विद्यार्थी मोठ्या संख्येत या स्पर्धेत सहभागी होऊ शकले. वेगळ्या विदर्भाची मागणी या अर्थाने व्हायला हवी. शेतकèयांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी वेगळा विदर्भ मागितला पाहिजे, असेही ते म्हणाले.
भरत पोटदुखे यांनी मात्र, आपण तटस्थ असून वेगळा विदर्भ कशासाठी, तर तो विकासासाठी वेगळा झाला पाहिजे. परिसराचा विकास व्हावा, हेच अंतिम लक्ष्य असावे. वेगळा विदर्भ होवून विकास होत असेल तरी चालेल qकवा हा परिसर संयुक्त महाराष्ट्रात राहून विकसित होत असेल तेही चालेल, असेही ते म्हणाले.
वेगळा विदर्भ हवा की नको, हा विषय ज्वलंत असून, सर्वत्र त्यावर चर्चा सुरू आहे. आपल्या महाविद्यालयातील विद्याथ्र्यांना या विषयाची संपूर्ण माहिती व्हावी या अपेक्षेतून जनसंवाद विद्या विभागाच्या माध्यमातून ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेला गोंडवाना विद्यापीठांतर्गत येणाèया महाविद्यालयांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला याचे समाधान आहे, असे मत प्राचार्य डॉ. जे. ए. शेख यांनी व्यक्त केले.
किशोर जोरगेवार पुरस्कृत प्रथम क्रमांकाचे बक्षिस डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, चंद्रपूरचा विद्यार्थी ऋषीदेव निकोडे याने पटकाविले असून, सुभाष कासनगोट्टूवार पुरस्कृत द्वितीय व तृतीय क्रमांकाचे मानकरी अनुक्रमे शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालय, चंद्रपूरचा योगेश ईटनकर आणि जनता अध्यापक विद्यालयालयाची विद्यार्थीनी शुभांगी नक्षिणे ठरली. स्पर्धेचे परीक्षण पत्रकार संजय तायडे, मजहर अली यांनी केले.
जनता महाविद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, सुशीलाबाई रामचंद्रराव मामीडवार महाविद्यालय, शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालय, सरदार पटेल महाविद्यालय, जनता अध्यापक विद्यालय चंद्रपूर तसेच कर्मवीर विद्यालय मूल, qचतामणी कॉलेज ऑफ सायन्स पोंभुर्णा, कला वाणिज्य महाविद्यालय गोंडपिपरी, महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय, गुरूनानक महाविद्यालय बल्लारपूर, राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय सावली, यादवराव पोशट्टीवार महाविद्यालय तळोधी बा., लोकमान्य टिळक महाविद्यालय वरोडा यासह अनेक महाविद्यालयांच्या चमुंनी स्पर्धेत भाग घेतला.
प्रारंभी, भरत पोटदुखे यांनी शैलेश पांडे यांचा शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार केला. तर, परीक्षक संजय तायडे, मजहर अली यांनाही स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. संचालन प्रा. पंकज मोहरील, तर आभार संजय रामगिरवार यांनी केले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी प्रा. रवी जुनारकर, प्रा. गजानन ताजने, तर जनसंवाद विद्या विभागाच्या विद्यार्थीनी सुजाता जक्कनवार, वर्षा नळे, धनश्री टेकुलवार, चंदन येदनुरवार आदींनी परिश्रम घेतले.