चंद्रपूर: सकाळी ९ वाजता आरती पार पडली आणि त्यानंतर गांधी चौकातून विसर्जनाची मिरवणूक निघाली. ही मिरवणूक पाहण्यासाठी आणि लाडक्या बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरले.
दरम्यान, विसर्जनासाठी प्रशासनाने शहरातील इरई नदी रामाला तलावांवर विशेष व्यवस्था केली होती. तसेच पोलिसांनी सर्वच ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला आहे. दुपारपर्यंत संथ गतीने सुरु असलेली विसर्जन प्रक्रिया रात्री गतिमान झाली आहे. संध्याकाळी जतपुरा ते गांधी चौक मार्ग गर्दी जमली होती' मोठ्या उत्साहात गणपती मूर्तींचं विसर्जन केले जात आहे. २०० सार्वजनिक गणपती मंडळानी गणेशमूर्ती स्थापन केली होती.