वर्धा: वर्धा जिल्ह्यातील विनयभंग प्रकरणाचा निकाल दिवाणी फौजदारी न्यायालयाने अवघ्या १७ दिवसांत निकाल दिला. आरोपी आरोपी मोरेश्वर माणिक सोनावणेला तीन वर्षांच्या सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे.
वर्ध्यातील कारंजा तालुक्यातील काजळी येथे २८ ऑगस्टला एका महिलेचा विनयभंग झाला. या प्रकरणाचा घटनेपासून २१ दिवसातच तर न्यायलयात दाखल केल्यापासून १७ दिवसातच निकालाची प्रक्रिया पार पडली.
२९ तारखेला आरोपी मोरेश्वर माणिक सोनावणे वय ३६ वर्ष रा. काजळी यास अटक करण्यात आली होती. त्यानंतर करंजा पोलीस स्टेशनने २ सप्टेंबरला २२ पानांचे आरोपत्र न्यायालयात दाखल केलं.
फिर्यादीची बाजू सरकारी वकील राजेश रेखे यांनी न्यायालायात मांडली. यानंतर ७ सप्टेंबरला फिर्यादी महिलेची साक्ष न्यायालायात नोद्वली गेली. त्यानंतर ७ साक्षीदारांच्या साक्ष न्यामुर्तीनी एकूण घेतली. यामध्ये सात वेळा सुनावणी झाली. आरोपीवर लावलेले आरोप सिद्ध झाले. यात ३५४ सह ३५४ (अ) आणि ३५४(ब) कलमाचा समाविष्ट करण्यात आला आणि आठव्या सुनावणीत निकाल देण्यात आला.
दिवाणी फौजदारी न्यायालयाचे न्यायाधीश रितेश मावतवाल यांनी १९ सप्टेंबरला अखेरच्या सुनावणीत, आरोपी मोरेश्वर माणिक सोनावणे याला तीन वर्षांचा कारावास आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.