महागाईच्या आगीचा भडका उडाला असताना आता शहरात पेट्रोल प्रतिलिटर 3 रुपये 9 पैशांनी, तर डिझेल 66 पैशांनी महागले आहे. शनिवारी (ता. 31) मध्यरात्रीपासून ही दरवाढ लागू झाली. या दरवाढीनंतर शहरातील पेट्रोल प्रतिलिटर 84 रुपये 11 पैसे, तर डिझेल 61 रुपये 84 पैसे दराने खरेदी करावे लागणार आहे.
ही दरवाढ किरकोळ असून यापेक्षाही मोठी दरवाढ लवकरच होणार आहे. गेल्या तीन महिन्यांत पेट्रोलची सहाव्यांदा, तर जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत डिझेलची आठव्यांदा दरवाढ करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्चा तेलाच्या वाढत्या किमती व डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या होणाऱ्या घसरणीमुळे तेल कंपन्यावर कोट्यवधींचा बोजा पडला आहे. यामुळेच दरवाढीचे संकट कायम आहे. त्या पाठोपाठ सिलिंडरच्या दरातही वाढ अपेक्षित आहे.