সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Tuesday, September 24, 2013

वरोर्‍यात २५ क्विंटल मासे मृत्युमुखी

वरोरा: येथील आनंदवनातील आनंद सागर तलावातील मासे मागील दोन दिवसांपासून अचानक मृत्युमुखी पडत आहेत. दोन दिवसांत २५ क्विंटल मासोळ्यांचा मृत्यू झाला असून त्यांची किंमत अडीच लाख रुपयांच्या घरात आहे. काही महिन्यांपूर्वी याच तलावात शेकडो मासोळ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती, हे विशेष.
रोहू व कथला वगळता अन्य जातींच्या मासोळ्या मात्र मृत्यूमुखी पडल्या नाहीत, हे विशेष. तलावातील पाण्यात विषबाधा झाली असती तर संपूर्ण मासोळ्याच मृत्युमुखी पडल्या असत्या, मात्र केवळ दोन जातीच्याच मासोळ्या मृत्युमुखी पडल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.
आनंदवनातील मूकबधिर शाळेच्या मागे आनंदसागर तलाव आहे. हा तलाव अतिशय जुना असून त्यातून मोठय़ा प्रमाणावर माशांचे उत्पादन घेतले जाते.तलावात रोहू, कथला, मांगूर, दाडक या जातींचे मासे आहेत. २२ व २३ सप्टेंबर रोजी रोहू व कथला या दोन जातींच्या मासोळ्या मृत्यूमुखी पडल्या. त्या २५ क्विंटलच्या जवळपास असल्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.तलावात मोठय़ा प्रमाणात पाणी आहे व तलावही मोठा असल्याने मासे उत्पादनासाठी उपयुक्त आहे. काही महिन्यांपूर्वी आनंदवन तलावातील शेकडो मासोळ्या मृत्यूमुखी पडल्याची घटना घडली होती. पाण्यातील ऑक्सीजनचे प्रमाण कमी झाल्याने मासोळ्या मृत्यू पडल्याचे कारण तज्ज्ञांनी दिले होते. परंतु दोन जातीच्या मासोळ्या मरण पावल्याने तज्ज्ञही अचंबीत झाले आहेत. काही मृत मासोळ्या परिक्षणासाठी नागपूर येथील प्रयोग शाळेत पाठविण्यात आल्या आहेत. उर्वरित मृत मासोळ्या खड्डा करून जमिनीत पुरण्यात आल्या आहेत. परिक्षणाचा अहवाल दोन दिवसांत आल्यानंतरच त्यांच्या मृत्युमुखी पडण्याचे कारण समोर येईल, असे मत महारोगी सेवा समितीचे विश्‍वस्त सुधाकर कडू यांनी व्यक्त केले.



শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.