সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Saturday, September 21, 2013

बेरोजगारांना गंडविणार्‍या टोळीचा पर्दाफाश

चंद्रपूर- घुग्घुस एमआयडीसी परिसरात कार्यरत असलेल्या धारीवाल कंपनीमध्ये शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी लावून देण्याच्या नावाखाली बेरोजगार युवकांची फसवणूक करणार्‍या टोळीचा पर्दाफाश पोलिसांनी केला.

गोरखधंदा करणार्‍या टोळीने धारीवाल कंपनीमध्ये नोकरी पाहिजे असल्यास पॉलिटेक्नीक धारक बेरोजगाराला दीड लाख, आयटीआयधारकास एक लाख, हेल्पर ५0 हजार व मजूर या पदासाठी २0 रुपये ठरविले. कंपनीच्या नावे बनावट दस्ताऐवज तयार करून बेरोजगारांची फसवणूक केली. फिर्यादीच्या तक्र ारीवरून आज शुक्रवार(२0 सप्टेंबर) ला उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. राजीव भुजबळ यांनी सहाजणांच्या टोळीला अटक केली.
आरोपींमध्ये हेमंत बबनराव बुरडकर (२६) रा. चंद्रपूर, दीपक काशीराम जेनेकर (४२), पवन यादव मेर्शाम (२३) रा. सुगम नगर, पवन नरेंद्र चौबे (२३), अविनाश लक्ष्मण जेनेकर (२७) रा. दुर्गापूर, समीर तानाजी बैसरकर (३८) रा. गवराळा (ता. भद्रावती) यांचा समावेश आहे.

घुग्घुस एमआयडीसी अंतर्गत धारीवाल कंपनी कार्यरत आहे. या कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली सदर आरोपींनी पॉलिटेक्नीकधारक बेरोजगाराला दीड लाख, आयटीआयधारकास एक लाख, हेल्पर ५0 हजार व मजूर या पदासाठी २0 रुपये ठरविले. नोकरीसंदर्भात आरोपी व बेरोजगार युवकांमध्ये सौदेबाजी झाल्यास लगेच अँडव्हान्स स्वरूपात अर्धी रक्कम घेण्याचा गोरखधंदा सुरू केला. नोकरी मिळताच पूर्ण रक्कम देण्याचा सौदा त्यांनी आजपर्यंत अनेक बेरोजगारांशी केला आहे. प्रफु ल्ल तडवटकर व पवन साधनकर यांना पैशाची मागणी करून नगदी ११ हजार रुपये घेतले. कंपनीच्या नावे बनावट दस्ताऐवज तयार करून नोकरीवर रुजू होण्याचे आदेश दिले. सदर युवकांनी आरोपींनी दिलेला आदेश घेऊन धारीवाल कंपनी गाठली. तेव्हा युवकांना आपली फसवणूक झाल्याची बाब उघडकीस आली. दरम्यान धारीवाल कंपनीचे अधिकारी संतोष वसंतराव काकडे यांनीही कंपनीची फसवणूक होत असल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणाला गांभीर्याने घेत सदर आरोपींना अटक केली.

यापूर्वीही नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगारांना गंडविल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणात मुख्य सूत्रधार कोण? बनावट दस्ताऐवज कोठून व कोणत्या साधनांचा वापर करून तयार करण्यात येत होते. या टोळीचे धागेदोरे आहेत काय? यासंदर्भात तपास करण्यात येत असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. भुजबळ यांनी दिली.


শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.