जागतिक पर्यावरण दिन विशेष
नागपूर /प्रतिनिधी:
महावितरणने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत ग्राहकांना अनेक सुविधा व सेवा ऑनलाईन उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यानुसार लाखो ग्राहक बसल्या जागेवरून कधीही वीजदेयकाचा भरणा ऑनलाईन करीत आहेत. ऑनलाईन असणारया ग्राहकांना कागदी वीज बिलाची गरज नाही व पर्यावरणप्रेमी ग्राहक कागद वाचवून, ‘गो ग्रीन’चा पर्याय वापरून ई मेल वर वीज बिल प्राप्त करून सोबतच वीज देयकात तीन रुपयाची सूट मिळवू शकतात.
‘दिवस-रात्र असता जर ऑनलाईन तर मग बिल भरायला का लावता लाईन? या महावितरणच्या आवाहनाला प्रतिसाद देत महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रात लाखो ग्राहक इंटरनेट च्या मदतीने मोबाईलअॅप चा वापर करून वीज देयकाचा भरणा ऑनलाईन करीत आहेत. मात्र पर्यावरणप्रेमी ग्राहकांनी कागद वाचविण्यासाठी व कागदी वीज बिलाची गरज नाही असे वीज ग्राहक गो ग्रीन या पर्यायाचा वापर करून प्रत्येक वीज बिलावर तीन रुपयाची बचत करू शकतात. ही सेवा महावितरणच्या संकेतस्थळावर नोंदणीकृत ग्राहकांसाठी आहे. याचा लाभ घेण्यासाठी ग्राहकाने महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावर भेट दिल्यानंतर ‘प्रथम’ consumer servies या लिंकवरून consumer web self service मध्ये ग्राहक नोंदणी करून युजर आयडी व पासवर्ड तयार करून घ्यावा. यामध्ये ई–मेल व मोबाईल क्रमाक व इतर माहिती नोंदवून घ्यावी, वीज देयक ई–मेल वर मिळण्यासाठी या माहितीची नोंद करावी. हा तपशिल अगोदरच नोंदविला असेल तरी एकदा खात्री करून घ्यावी. संकेतस्थळावर consumer servies ‘च्या खाली ‘go green’ येथे क्लिक केल्यानंतर यामध्ये ग्राहक क्रमाक व बिलीग युनिटची माहिती दयावयाची आहे त्यानंतर तुमच्या चालू महिन्यातील वीज बिलावरील डाव्या बाजूला असलेल्या (GGN) गो ग्रीन नंबर क्रमाक नोंद केल्यानंतर महावितरण कडून नोंदणी असलेल्या ई-मेल वर खातरजमा करण्यासाठी लिंक पाठविली जाईल. ग्राहकाने सदर पुष्टी केल्यानंतर गो -ग्रीनची नोदणी पूर्ण होईल. त्यानंतर पुढील महिन्याला वीज देयकाची कागदी प्रत मिळणे बंद होईल व नोंदणीकृत ई-मेल वर वीजदेयक मिळेल सोबतच प्रत्येक वीज बिलात ३ रुपयांची सूट मिळण्यास सुरुवात होईल.
मोबाईल क्रमाकाची नोदणी असल्यामुळे सोबतच मोबाईलवर सुद्धा एसएमएस द्वारे देयकाची माहिती मिळेल. गो ग्रीन सेवा ग्राहक कधीही बंद करू शकतात. कागदी वीज बिल मिळत नसले तरी ग्राहकांना मागील वीज देयके पाहण्याची सुविधा महावितरणचे संकेतस्थळ व मोबाईल अॅपवर सुद्धा उपलब्ध आहे. त्यामुळे कागदी वीज बिलाएवजी गो ग्रीनचा पर्याय स्विकारीत ई-बिल चा वापर करणे म्हणजेच झाडांचे आणि पर्यायाने पर्यावरण संरक्षणास मदत करण्यासोबतच मासिक बिलात तीन रुपयांची बचत आहे.