সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Monday, June 04, 2018

“अनुभूती” या सांगीतिक ऊर्जेसह महानिर्मितीचा १३ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

नागपूर/प्रतिनिधी:
वीज क्षेत्रातील वाढती स्पर्धा व भविष्यातील आव्हानांना पेलण्याकरिता महानिर्मितीच्या मनुष्यबळाने अद्ययावत ज्ञानासोबत स्मार्टवर्क करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन महानिर्मितीचे संचालक(संचलन) चंद्रकांत थोटवे यांनी केले. प्रकाशगड मुख्यालय, वांद्रे,मुंबई येथे महानिर्मितीच्या १३ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित “अनुभूती” या मराठी-हिंदी गीतांच्या सांगीतिक कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. वीज उत्पादनाशी निगडीत असलेले अधिकारी-कर्मचारी तणावमुक्त राहावेत,त्यांच्यामध्ये नवा जोश निर्माण व्हावा यादृष्टीने “अनुभूती” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कोळसा, पाणी व तंत्रज्ञान यांच्या सुयोग्य नियोजनातून महानिर्मितीच्या मनुष्यबळाने सातत्याने ६५०० मेगावाट वीज उत्पादन केल्याने यावर्षी कडाक्याच्या उन्हाळ्यात देखील राज्यातील जनतेला भारनियमनमुक्तीचा दिलासा देण्यास मोठा हातभार लावल्याबद्दल चंद्रकांत थोटवे यांनी महानिर्मितीच्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. 
महानिर्मितीचे संचालक(संचलन) चंद्रकांत थोटवे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रमुख अतिथी म्हणून मराविमं सूत्रधारी कंपनीचे संचालक विश्वास पाठक, महानिर्मितीचे संचालक(प्रकल्प) विकास जयदेव, संचालक(वित्त) संतोष आंबेरकर, महावितरणचे संचालक(संचलन) अभिजित देशपांडे, संचालक(प्रकल्प) दिनेशचंद्र साबू, संचालक(वित्त) जयकुमार श्रीनिवासन इत्यादी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित मराविम सूत्रधारी,महानिर्मिती व महावितरणच्या सर्व संचालकांचा यथोचित सन्मान करण्यात आला. प्रारंभी प्रास्ताविकातून, कार्यकारी संचालक(मानव संसाधन) विनोद बोंदरे यांनी आयोजनामागची भूमिका विषद केली. वर्धापन दिन सोहळ्याचे सूत्रसंचालन सोनाली चुगडे यांनी तर आभार प्रदर्शन महाव्यवस्थापक(मानव संसाधन) आनंद कोंत यांनी केले.
विनोद बोंदरे यांचे संकल्पनेतून साकारलेल्या “अनुभूती” या सांगीतिक कार्यक्रमासाठी मध्य भारतातील सुप्रसिद्ध गायक सागर मधुमटके, योगेंद्र रानडे, इशा रानडे, सारंग जोशी, वादक मंडळींमध्ये नंदू गोहणे(ऑकटोपॅड), राजा राठोड(कि बोर्ड), परिमल जोशी(कि बोर्ड),रॉबिन विलियम(गिटार),प्रशांत नागमोते(तबला) तर श्वेता शेलगावकर यांच्या अर्थपूर्ण बहारदार सूत्रसंचालनाने रसिकांना दर्जेदार “अनुभूती” मिळाली. सुप्रसिद्ध गायक किशोर कुमार, मोहम्मद रफी, मन्ना डे,कुमार शानू, अरुण दाते, लता मंगेशकर,आशा मंगेशकर यांची अजरामर गाणी त्यांच्या हुबेहूब आवाजात सादर केल्याने एकाहून सरस एक जुनी-नवी गाणी रसिकांना ऐकायला मिळाली. ज्यामध्ये “मोरया-मोरया”, “जयोस्तुते”, “या जन्मावर या जगण्यावर”, “शुक्रतारा मंद वारा” सारख्या सुमधुर मराठी गीतानंतर “आओ हुजूर तुमको”, “मेरे सपनो कि रांनी”, “फिर वही रात है”, “आप कि नजरो ने समझा”, “गाता रहे मेरा दिल”, “न जा कहि अब ना जा”, “लाखो है निगाह मे”, “इशारो इशारो” , “कुहू कुहू बोले”, “बेखुदी मे सनम”, “जिंदगी कैसी है पहेली हाये”, “यारी है ईमान मेरा यार मेरी जिंदगी”,”बाबू समझो इशारे”, “तुम मुझे यु भुला ना पाओगे”, “जाईये आप कहा जाएंगे”, “होटो मे ऐसी बात मै”, “तुम दिलकि धडकन हो”, “बचना ए हसीनो”, “प्यार तुम्हे इस मोड पे ले आया”, “लागा चुनरी मे दाग” या भैरवीने “अनुभूती” या अविस्मरणीय कार्यक्रमाची सांगता झाली. 
विशेष अतिथी म्हणून कार्यकारी संचालक कैलाश चिरूटकर,राजू बुरडे,सतीश चवरे,विनोद बोंदरे, नितीन चांदुरकर, प्रदीप शिंगाडे, चंद्रशेखर येरमे तर मुंख्य अभियंते अभय हरणे,राजेश पाटील, जयंत बोबडे, पंकज सपाटे,अनंत देवतारे, सुनील आसमवार, प्रभाकर निखारे, उमाकांत धामणकर, रवींद्र गोहणे, चंद्रशेखर सवाईतुल,धैर्यधर खोब्रागडे, प्रमोद नाफडे, श्यामसुंदर सोनी, संजय मारुडकर, बाबर, मुख्य महाव्यवस्थापक पंकज शर्मा, लाबडे,नितीन वाघ, कंपनी सचिव राहुल दुबे,वरिष्ठ अधिकारी, अभियंते,कर्मचारी,कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी “टीम अनुभूती महाजनकोचे” महत्वाचे योगदान लाभले.



শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.