সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Saturday, January 06, 2018

चंद्रपूर मेडिकल कॉलेजमधून अमृत आऊटसोर्स फार्मसी प्रकल्प सरकार राबविणार

नागपूर/प्रतिनिधी:                                   
शहरांमध्ये जीवनशैलीशी निगड‌ित आजारांचा विळखा दिवसेंदिवस वाढत आहे. हृदयरोग, रक्तदाब, मधुमेहासोबतच कर्करोगाचाही विळखा वाढत आहे. एकदा का या आजारांनी घेरले, की आयुष्यभरासाठी औषध आणि गोळ्यांचे पाकीट खिशात येऊन पडते. त्यामुळे दारिद्र्यरेषेखालील रुग्णांची आर्थिक ओढाताण होते. ती काहीशी दूर करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण व संशोधन आणि औषधी द्रव्य विभागाने पुढाकार घेतला आहे. विदर्भातील नागपूर, यवतमाळ आणि चंद्रपूर मेडिकल कॉलेजमधून अमृत आऊटसोर्स फार्मसी हा पथदर्शी प्रकल्प सरकार राबविणार आहे.
सरकारची अंगीकृत कंपनी एचएलएल (लाईफ केअर लिमिटेड) नागपुरातील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, शासकीय महाविद्यालय व रुग्णालय व अतिविशेषोपचार रुग्णालय या तीन ठिकाणांसह चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आणि यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अशा पाच ठिकाणी हे केंद्र सुरू करणार आहे. अमृत अर्थात (अफॉर्डेबल मेडिसीन अँड रिलायबल इम्प्लांट फॉर ट्रिटमेंट) मार्फत कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी लागणारी २०२ प्रकारची औषधे, हृदयरोग रुग्णांसाठी लागणाऱ्या १८६ औषधी बाबी आणि १४८ इतर बाबी बाजारभावापेक्षा कमी दराने रुग्णांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या अंतर्गत असलेल्या वैद्यकीय महाविद्यालये व संलग्नित रुग्णालयांमध्ये बऱ्याच ठिकाणी कॅन्सर व हृदयरोग रुग्णांवर उपचार केले जातात. या संस्थामध्ये अमृत आउटलेट फार्मसी सुरू करण्याच्या अनुषंगाने एचएलएल लाइफ केअर लिमिटेड या कंपनीसोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यास संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन यांना नुकत्याच जाहीर झालेल्या शासन निर्णयान्वये परवानगी देण्यात आली आहे.
 अमृत फार्मसी साठी इमेज परिणाम

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.