पैश्याचे आमिष दाखवून केला अत्याचार
भद्रावती/प्रतिनिधी:
भद्रावती तालुक्यातील लालाजी तुकाराम पिंपळे वय (50) व अशोक हनवते अशी आरोपींची नावे
असून यांनी गावातील अकरा वर्षीय दोन अल्पवयींन मुलींवर गेल्या चार दिवसापूर्वी अत्याचार केले तर
दुसऱ्या आरोपींनी या दोन अल्पवयीन मुली सोबत पैश्याचे लालच दाखवून आणखी एका मुलीवर अत्याचार केल्याचे पीडित मुली आपल्या वडिलांना सांगितली. पालकांनी हा संपूर्ण घडलेला प्रकार पोलिसांना सांगत आरोपीं विरोधात तक्रार दाखल केली, हा संपूर्ण प्रकार पीडित मुलींचे पोट दुखत असल्याने त्यांनी आपल्या पाल्यांना सांगितले, पालकांनी नेमके काय झाले अशी विचारणा मुलीच्या पालकांनी केली असता तिने आपल्यासोबत आणि आपल्या मैत्रिणींसोबत काही लोकांनी मिळून अत्याचार केला असल्याची बाब सांगितली, हा संपूर्ण प्रकार चार दिवस अगोदर घडल्याचे सांगितल्या जात आहे. या दोन्ही घटना वेगवेगळ्या असून पीडित मुलीच्या वडिलांनी याप्रकरणी पोलिसांनी दाखल केली असून आरोपींना अटक करत आरोपीं सुरज अशोक हनवते रा. विसापूर याच्यावर अप क्र. ००४५/१८ क ३७६ (२)(I)(J), ५०६ भा.द.वि ६ बाल लैंगिक अ.प्र.का नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून दुसऱ्या प्रकरणातील आरोपी लालाजी तुकाराम पिंपळे यांचेवर पोलिसांनी अप.क्रमांक ००४४/१८ कलम ३७६ (२)(I)(J)५०६ भा.द.वि ६ बा.लै.अ.प्र.का ३ (१)(W)(II),३(२)(V)३ (२)(VA) ३ (२) (५) अ.जा.ज अ प्र.का २०१५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास अप्पर पोलीस अधीक्षक हेमराज सिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे