चंद्रपूर जिल्हयातील कृषि आधारीत अर्थव्यवस्थेला व एकूण शेती व्यवस्थेला जलव्यवस्थापन, कृषि व्यवस्थापन व बदलत्या परिस्थितीत शेतीमधील बदल स्विकारण्याबाबतचे विचार मंथन आज पासून चंद्रपूरच्या चांदा क्लबवर सुरु झाले आहे.राज्यातील वापरायोग्य पाण्याची उपलब्धता, वाढती लोकसंख्या, वाढते उद्योग, अनियमित पर्जन्यमान यामुळे पाण्याच्या वापरावरील ताण वाढणार आहे, यासाठी जलजागृती आवश्यक आहे. त्यामुळे राज्य शासनाने वित्त, नियोजन, वनेमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात राज्याला जलसाक्षर करण्यासाठी नियोजन करण्याची आखणी केली होती. नागपूर महसूल विभागात चंद्रपूरची विभागीय जलसाक्षरता केंद्रासाठी निवड करण्यात आली. जलसंधारण मंत्री राम शिंदे यांच्या उपस्थितीत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार हे जलसाक्षरता कार्यशाळेचे व विभागीय जलसाक्षरता केंद्राचा शुभारंभ करण्यात आले.
याचवेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, महिला स्वंयस्वायत्ता समुहामार्फत कृषि प्रदर्शनी व वस्तु विक्री प्रदर्शनीलाही प्रारंभ झाला. 15 ते 19 जानेवारी या काळामध्ये ही प्रदर्शनी चालणार असून या ठिकाणी कृषि तंत्रज्ज्ञानातील नवनवीन अविष्कार बघायला मिळणार आहे. शेतीशी नाळ जुळली असणा-या प्रत्येक विद्यार्थ्याने, गृहीनीने व शेतक-यांने या चार दिवसांच्या कार्यक्रमात चांदा क्लब मैदानाला भेट दयावी, असे आवाहन करण्यात आले आहे. या ठिकाणी या प्रदर्शनीमध्ये जिल्हयातील एकूण शंभर महिला बचत गट सहभागी होत आहे.

या प्रदर्शनीमध्ये सहभागी गटांच्या माध्यमातून बाजाराच्या मागणीनुसार विविध गृहोपयोगी उत्पादने विक्रीस उपलब्ध राहणार आहेत. यामध्ये लोणचे, धने, शेवया, चटनी, रेडीमेड कपडे, खादीचे कपडे, कडधान्य, मसाल्याचे पदार्थ, खाद्यपदार्थ, लांब पोळी, पुरण पोळी, झुनका भाकर, मोहाची भाकर, जवस चटण्या, मातीचे भांडे, लोकरी वस्तू, टेबल क्लॉथ, मेंढीच्या केसापासून बनलेल्या गादया, उशा, घोंगडी, लाकडी शिल्प, टोपल्या, सुप-परडे, खराटा, झाडू, कंदील, शोपीस, हातसळीचे तांदुळ, सुहासीक तांदुळ, कापडी बॅग, मशरुम, टेराकोटा, गांडूळ खत, गोमुत्र अर्क, आयुर्वेदिक उत्पादने, तुरदाळ, उडीद, चणा, मुग, मटकी, चवळी इत्यादी ग्रामीण भागातील कडधान्ये विक्रीला उपलब्ध होणार आहेत.