नवी दिल्ली/काव्यशिल्प ऑनलाईन :
प्रजासत्ताक दिनी दिल्लीच्या राजपथावर अवतरलेल्या महाराष्ट्राच्या चित्ररथाला प्रथम क्रमांक मिळाला आहे. कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी हा चित्ररथ साकारला होता. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा चित्ररथ मोठ्या दिमाखात राजपथावर उतरला होता. त्याचाच गौरव झाला असून महाराष्ट्राच्या चित्ररथाने प्रथन क्रमांक पटकाविला आहे. चित्ररथांमध्ये आसामने दुसरा तर छत्तीसगडने तिसरा क्रमांक पटकाविला आहे.महाराष्ट्राच्या चित्ररथातील कवी भूषण यांचं हे काव्य अजय-अतुलने संगीतबद्ध केलेलं आहे.