সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Monday, January 15, 2018

रामटेक येथे शेतकर्‍यांना शासकीय माहितीचे धडे

रामटेक/प्रतिनिधी:
                    कृषी उत्पन्न बाजार समिती रामटेक येथे प्रांगणात शासकीय योजनांची माहिती कार्यशाळेचे आयोजन पार पडले. कार्यक्रमाला आ. रेड्डी, मुख्य प्रशासक अनिल कोल्हे, उपमुख्य प्रशासक किशोर रहांगडाले, नगरसेविका वनमाला चौरागडे, अडतिया संघाचे अध्यक्ष सोहनलाल यादव तालुका खेरदी विक्री संघाचे अध्यक्ष अनिल गुप्ता संपूर्ण प्रशासक मंडळ व शेतकरी वर्ग योजनांची माहिती करून घेण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर उपस्थित होता. यावेळी नववर्ष २0१८ या कॅलेंडरचेही लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
                                                     बाजार समिती मुख्य प्रशासक अनिल कोल्हे यांनी यावेळी शासनाच्या विविध योजना व बाजार समितीच्या भावी योजनांची माहिती दिली. त्यात शेतकर्‍यांना मिळणार्‍या शेतमाल तारण कर्ज योजना, संत शिरोमणी, श्री सावतामाळी शेतकरी आठवडी बाजार अभियान, कृषी पणन मित्र मासिक, शासकीय खरेदी हर्टीकल्चर एक्सपोर्ट ट्रेनिंग कोर्स, बाजार समितीच्या निवडणुकीत शेतकर्‍यांचा सहभाग याविषयी सविस्तर व अभ्यासपूर्ण माहिती दिली.
                                                 बाजार समितीच्या वतीने लवकरच धरम काट्याची व्यवस्था करणे, संपूर्ण बाजार आवाराचे काँक्रिटीकरण करणे, सुलभ शौचालयाची व्यवस्था करणे, शेतकर्‍याकरिता बळीराजा निवास योजना व भोजन व्यवस्था करणे, शेतकर्‍यांच्या शेतमाल साठवणुकीकरिता व शेतमाल तारण योजना राबविण्याकरिता गोदाम व्यवस्था करणे, समितीच्या कार्यक्षेत्रातील मौजा देवलापार येथे उपबाजार निर्माण करणे अशा स्वरुपाचा बाजार समितीचा भावी योजनांची माहिती दिली. मला शेती आणि शेतकर्‍यांचा विकास करावयाचा असून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून परिपूर्ण प्रयत्न करणार असल्याचे यावेळी सांगितले. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या क्षेत्रात शेतकर्‍यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देऊन शेतकर्‍यांचे व्यापक हित साधणार आहे, असे मत मुख्य प्रशासक अनिल कोल्हे यांनी व्यक्त केले.  
                                         आ. रेड्डी यांनी कृउबा समितीच्या नवनियुक्त प्रशासन मंडळाने शेतकर्‍यांच्या हितासाठी प्रयत्न करावे. शेतकर्‍यांना जास्तीत जास्त सुविधा मिळवून द्यावा तसेच शेतकर्‍यांचा हितासाठी नव नवीन व प्रभावी उपायांची अंमलबजावणी करण्यासही मंडळास सुचविले. संपन्न झालेल्या या कार्यक्रमाची उपस्थिती शेतकर्‍यांनी प्रशंसा केली. नवनियुक्त प्रशासक मंडळाने शेतकर्‍यांसाठी तसेच त्यांचा आर्थिक दर्जा उंचावण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचेही मत यावेळी व्यक्त केले. संचालन सचिव हनुमंता महाजन, आभार प्रदर्शन चरणसिंग यादव तर आयोजनासाठी निक्की महाजन, उमराव मेर्शाम, प्रकाश लेंदे, विकास महाजन, अश्‍विनी उईके, शिल्पा शेंडे, गुलाब अडमाची इतर कर्मचारी वर्गाने सहकार्य केले.
                                          यावेळी शेतकर्‍यांच्या समस्या सोडविण्याकरिता आमचे प्रशासक मंडळ नेहमी कार्यरत राहणार असल्याचे आश्‍वासन कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक अनिल कोल्हे, उपमुख्य प्रशासक रहांगडाले, क्रि ष्णा माल, चरणसिंग यादव, दिगांबर वैद्य, दुर्गावती सरियाम, महेश ब्रह्मनोटे, सुंदरलाल ताकोद, चंद्रभान धोटे, संजय गुप्ता, प्रकाश मोहारे, सुधीर धुळे, खेलन पारखी, कृष्णा मस्के, मोतीराम तरारे, कृष्णा रेड्डी, बाबुलाल बरबुडे यांनी यावेळी शेतकर्‍यांशी संवाद साधताना दिले.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.