সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Monday, January 29, 2018

राजस्थानी गायक व नृत्यांगनांनी गाजविला कालीदास महोत्सव

 कालीदास स्मारकाची मात्र यावेळीही उपेक्षाच,राहीली अंधारातच
रामटेक तालुका प्रतिनिधी-
रामटेकच्या ज्या पावन व निसर्गरम्य भुमीत महाकवी कालीदासांनी मेघदूत या  अजरामर महाकाव्याची रचना केली त्याच भुमीत गेली विस वर्शे सातत्याने(मधली काही वर्षे वगळता)संपन्न होणारया  कालीदास समारोहाचे दोन दिवसीय भव्य आयोजन रामटेकच्या नेहरू मैदानावर संपन्न  यावर्षीच्या  कालीदास महोत्सवावर राजस्थानी गायक,कलावंत,वाद्यवृंद व  नृत्यांगनांनी आपली अमिट छाप उमटविली. आयोजन समीतीने केलेल्या भव्य  आयोजनप्रसंगी केलेला नेत्रदिपक मंच व बैठकव्यवस्थेची रसीकांनी प्रशंसा केली.  विभागीय आयुक्त अनुपकुमार या मुळातच कलोपासक अधिकाऱ्याला  दर्जेदार आयोजनाचे श्रेय द्यायला हवेच तद्वतच रामटेकचा कालीदास महोत्सव रामटेकला  करण्यासाठी वृत्तपत्रांनी बातम्या लीहील्यानंतर अत्यंत ताकदीने हा कार्यक्रम  रामटेकला व्हावा यासाठी स्थानीक आमदार डी.मल्लिकार्जुन रेड्डी यांनी केलेले  प्रयत्न प्रशासनीय आहेत व हा कार्यक्रम रामअेक झाला यासाठीचे श्रेयही अनुपकुमारांनी आमदारांना दिले हे विषेश.

महोत्सवाच्या दुसर्या  दिवशी उद्घाटन अनाथांचे नाथ असलेल्या प्रसिद्ध  समाजसेवक शंकरबाबा पापळकर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी मंचावर  आमदार डी मल्लिकार्जुन रेड्डी,विभागीय आयुक्त अनुपकुमार,माजी आमदार  आनंदराव देशमुख ,उपनगराध्यक्षा कविता मुलमुले,माजी नगराध्यक्ष अशोक  बर्वे,गजाननरा भेदे,पर्यटक मीत्र चंद्रपाल चौकसे,आदिवासी अप्पर आयुक्त उॉ माधवी  खोडे,उपायुक्त रविंद्र ठाकरे,तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष त्रिलोक मेहर,सुधाकर तेलंग,सचिन कलंत्री,उपविभागीय अधिकारी राम जोशी ,तहसिलदार धर्मेश  फुसाटे,व अन्य अधिकारी,लोकप्रतिनिधी हजर होते.

दुसर्या दिवशी सोंगी मुखोटे या नाशीकच्या कलावंतानी सादर केलेल्या  नृत्याने रसकिांच्या मनावर मोहीनी घातली तर राजस्थानी ललनांनी सादर केलेल्या भवाई नृत्याने रसिकांच्या हृदयाचा ठोका चुकविला.राजस्थानी गायक कलावंतानी भजन सादर केले.आलोक टंडन यांच्या पंथी नृत्याला मात्र म्हणाव तसा प्रभाव पाडता आला नाही. नामदेव आडे आणि संचाने सादर केलेले ढेमसा नृत्य,फकीरा कोम आणी संचाने सादर केलेल्या रेला नृत्याने आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविले. स्थानीक कलावंतांनाही यावेळी सादरीकरणाची संधी मीळाली मात्र त्यांना आपल्या  कलेचा कुठलाही प्रभाव पाडता आला नाही.उलट कालीदास महोत्सवासारख्या आंतर्रास्त्रीय  दर्जेदार कार्यक्रमाची आगामी काळांत मंडई होवू नये अषी अपेक्षा रसिकांनी यावेळी व्यक्त केली.महोत्सवावर आपल्या कलेचा अमिट ठसा राजस्थानी  कलावंतानीच उमटविला.पहीला दिवस गायक कलावंतानी गाजविला तर दुसरा दिवस जोशपुर्ण भवाई नृत्य,कालबेलिया आणी कजरी नृत्यांचा देखणा अविष्कार  करीत  राजस्थानी ललनांनी ससिकांना भावविभोर केले. कार्यक्रमाच्या भव्य आयोजनाच्या यशस्वीतेसाठी आयुक्तांनी जाहीरपणे  आपल्या भाषणातून  रामटेकचे उपविभागीय अधिकारी राम जोशी ,तहसिलदार धर्मेश  फुसाटे व त्यांच्या संपुर्ण चमूचे कौतुक केले.रसिकांच्या हजारोंच्या संख्येत उपस्थितीबद्दल अनुपकुमारांनी धन्यवाद दिले.महाकवी कालीदासांचा मात्र प्रशासनाला विसर पडला होता. रामटेकच्या गडावरील त्यांच्या स्मारकावर कुठल्याही प्रकारची रोषणाई यानिमीत्ताने करण्यात आली नव्हती.





শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.