चंद्रपूर/प्रतिनिधी:(ललित लांजेवार ९१७५९३७९२५)
श्री साईबाबांनी 1918 साली दसऱ्याला समाधी घेतली बाबांच्या समाधीला १०० वर्ष पूर्ण होत आहे. याच शताब्दी वर्षानिमित्त साई विचार व साई जीवन दर्शन सर्वसामान्यपर्यंत पोहोचविण्याचा हेतूने श्री साई समिती शताब्दी जन्मोत्सव साजरा करण्याचे ठरविले आहे.
शताब्दीउत्सवानिमित्त प्रत्यक्ष साईबाबा पादुकांच्या स्वरुपात दिनांक 1 फेब्रुवारी 2018 चांदा क्लब ग्राउंड जुना वरोरा नाका, चंद्रपूर येथे श्री.साई समिती शताब्दी महोत्सव समिती विदर्भ (आओ साई पालखी सेवा समिती चंद्रपूर द्वारे) व श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी यांच्या संयुक्त आयोजनाद्वारे अधिकृत मूळ साई चर्मपादुकांचे आगमन शहरात होत आहे. या निमित्य विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे यात
भव्य श्री.साई महायद्य ,108 कुंडी ,108 जोडप्यांन द्वारे संकल्पित, साईबाबांच्या मूर्तीचा अभिषेक भिक्षा झोली आयोजन यासोबत विशेष आकर्षण म्हणून श्री साई समाधि मंदिर प्रतिकृती, एक दिवसीय भव्य महाप्रसाद वितरण व साई पादुकांचे शहरातून भव्य शोभायात्रा,याचसोबत सबका मालिक एक भव्य साई सत्तचरित आधारित संध्याकाळी 7 ते 10 वाजेपरीयंत महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. या संपूर्ण कार्यक्रमाला हजार राहण्याचे आव्हाहन आओ साई पालखी सेवा समिती चंद्रपूर, श्री. साई बाबा मंदिर दाताळा चंद्रपूर, श्री. साई बाबा मंदिर सिव्हिल लाईन चंद्रपूर, श्री.शिव साई मंदिर तुकूम चंद्रपूर, द्वारकामाई साई सेवा समिती भिवापूर वॉर्ड चंद्रपूर,श्री साई बाबा मंदिर टंडन ले आउट चंद्रपूर, साई सेवक राजुरा, श्री,साई सेवा चारितीब्ल ट्रस्ट राजूर कॉलनी वणी,यांच्या मार्फत करण्यात आले आहे.