जिल्हाभरात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा होत असताना गेल्यावर्षी १५ ऑगस्टला ध्वजारोहणावरून सुरु झालेल्या चंद्रपूर काँग्रेसच्या दोन गटातील वाद यंदा देखील कायम राहिल्याचे चित्र यंदाच्या २६ जानेवारीच्या ध्वजारोहण कार्यक्रमात दिसून आला, चंद्रपूर शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या गांधी चौकातील ध्वजारोहण पुन्हा एकदा प्रशासनातील नायब तहसीलदारांनी केले आहे.
शहरात वडेट्टीवार आणि पुगलिया असे दोन गट आहे. १५ ऑगस्ट २०१७ ला हे दोन्ही गट चंद्रपूर शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या गांधी चौकातील ध्वजारोहण "आम्ही"करणार म्हणून आपापसात समोर आले होते, यात गेली सत्तर वर्ष सातत्यानं चंद्रपूरच्या गांधी चौकात जयस्तंभाजवळ काँग्रेसची अधिकृत झेंडावंदन रंपराच मोडीली गेली होती.
याच संदर्भात २४ जानेवारी २०१७ ला शहर पोलीस स्टेशन येथे वडेट्टीवार आणि पुगलिया या दोन्ही गटाची बैठक संध्याकाळी ६ वाजता बोलावण्यात आली होती. मात्र या बैठकीस पुगलिया गटावतीने मनपा गटनेते डॉ. महाकुलकर ,अविनाश ठावरी,देवेंद बेले प्रवीण पडवेकर, अशोक नागपुरे,सुधाकरसिंग गौर,प्रशांत दानव उपस्थित होते.मात्र वडेट्टीवार गटाचे एकही प्रतिनिधी उपस्थित नसल्याने दोन्ही गटात समन्वय होऊ शकला नाही.त्यामुळे पुगलिया गटाने आम्हाला ध्वजारोहन करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली होती , रात्री ९ वाजताच्या सुमारास वडेट्टीवार गटाकडून नंदू नागरकर,सुनिता लोढिया,मलक शाकिल, हे शहर पोलीस स्टेशन येथे उपस्थित झाले. व नंदू नागरकर यांनी मी शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष असल्याने आम्हालाच या गांधीचौक येथील प्रजासत्ताक दिनाची परवानगी देण्यात यावी अशी मागणी केली.
या दोन्ही गटात समन्वय नसल्याने याठिकाणी कोणत्याही एका गटाला परवानगी देणे पोलीस प्रशासनाला शक्य नव्हते. व त्यामुळे या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न देखील निर्माण होऊ शकत होता ,यातच चंद्रपूर उपविभागीय दंडाधिकारी मनोहर वसंत गव्हाळ यांनी आदेश देत उपविभागीय अधिकारी कार्यालय चंद्रपूरचे नायब तहसीलदार प्रमोद कुलटे यांना ध्वजारोहण करण्याची परवानगी दिली.तर शहर पोलीस निरीक्षक यांना ध्वजारोहणासाठी योग्यता व्यस्था करण्याचे आदेश दिले.या आदेशांनंतर देखील कोणताही अनुचित प्रकार जर त्याठिकाणी घडला तर भारतीय दंड संहितेच्या सलाम १८८ नुसार कारवाई करण्याचे आदेशही काढण्यात आले होते.
स्वातंत्र्यदिनी व प्रजासत्ताकदिनी खरंतरं सारे रागलोभ दुरावे विसरून एकत्र येण्याचा दिवस असतो. मात्र चंद्रपूर काँग्रेसच्या नेत्यांना मात्र तसं काही वाटत नाही असे या उदाहरणावरून लक्षात येत . कारण ध्वजारोहण कुणी करायचं या वादात अडकलेल्या वडेट्टीवार आणि पुगलिया गटांनी काँग्रेसची ध्वजारोहणाची परंपरा मोडीत काढल्याने या नंतर देखील गांधीं चौकातील ध्वजारोहण हे प्रशासनाच्या मध्यस्तीनेच होणार हे मात्र नक्की झाले आहे.