সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Saturday, January 06, 2018

संस्कृत शिकू इच्छिणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी

संस्कृत विद्यापीठात बी.ए. अतिरिक्त संस्कृत परीक्षेचे आवेदनपत्रा भरण्याची प्रक्रिया सुरू 
रामटेक/प्रतिनिधी:
कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाद्वारे संस्कृत शिकण्याची इच्छा असणाऱ्यां जिज्ञासूंसाठी अतिरिक्त संस्कृत विषय घेवून बी.ए. करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. नुकत्याच या विषयातील परीक्षांच्या तारखा विश्वविद्यालयाने जाहीर केलेल्या आहेत. 
 ही परीक्षा दि. 21 मार्च ते 26 मार्च 2018 या दरम्यान  आयोजित करण्यात आलेली आहे. परीक्षेला बसण्यासाठी विद्यार्थ्यांना रु. 1,100/- परीक्षा शुल्क भरून आवेदनपत्रा भरता येणार आहे. आवेदनपत्रा दिनांक 08.01.2018 ते 09.02.2018 या कालावधीत स्वीकारण्यात येतील. तसेच विलंब शुल्क रु. 1,600/- सह दिनांक 10.02.2018 ते 28.02.2018 पर्यन्त आवेदनपत्रा स्वीकारले जातील. दिनांक 28.02.2018 नंतर कोणतेही आवेदनपत्रा स्वीकारता येणार नाही. विश्वविद्यालयाच्या kksanskrituni.digitaluniversity.ac या संकेतस्थळावरून आवेदनपत्रा डाऊनलोड करावे अथवा 07114-255747 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.   विद्यार्थ्यांनी आवेदनपत्रासह जोडावयाचा परीक्षा शुल्काचा धनाकर्ष (डी.डी.) “कुलसचिव, कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय, नागपूर“ यांचे नावे तयार करावयाचा आहे. आवेदनपत्रासोबत जोडावयाचे आवश्यक दस्तावेजांची यादी, परीक्षेचे प्रवेशपत्रा, अभ्यासक्रम आणि पेपर पॅटर्न याबाबतची सविस्तर माहिती विश्वविद्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे, अशी माहिती परीक्षा नियंत्राक डॉ. उमेश शिवहरे यांनी दिली.
sanskrut साठी इमेज परिणाम

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.