সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Saturday, January 13, 2018

माळरानावर राहत असलेल्या महिलेचा आकस्मिक मृत्यू

चंद्रपूर :  गेल्या महिनाभरापासून हल्यापोटी गावसोडून माळरानावर राहत असलेल्या गावकऱ्यांपैकी एका महिलेचा आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना घडल्याने एकच खड़बड उडाली. 
तेलंगणा व आंध्रातील आरक्षण वादापोटी संभावित हल्ल्याच्या भयाने उघड्या माळरानावर महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमेवर १० वर्षांपूर्वी वस्ती थाटलेल्या प्रेमनगरातील गुणाबाई उत्तम जाधव महिलेचा शनिवारी पहाटे मृत्यू झाला.

चंद्रपूर जिल्ह्याच्या जिवती तालुक्यापासून २७ कि.मी. अंतरावर प्रेमनगर हे गाव १० वर्षांपूर्वी वसले. तेथे उदरनिर्वाहासाठी आलेल्या नागरिकांकरिता महाराष्ट्र सरकारने पिण्याच्या पाण्याची, विजेची व रस्त्याची व्यवस्थाही करून दिली. मात्र तेलंगणा व आंध्रप्रदेशातील आरक्षणाच्या वादामुळे बंजारा व आदिवासी समाजात असंतोष निर्माण झाला. प्रेमनगरची नोंद महाराष्ट्रासोबत तेलंगणातही करण्यात आली असल्याने आरक्षणाचा लाभ महाराष्ट्रातील नागरिकांना मिळणार या नाराजीपोटी तेलंगणातील लोकांनी प्रेमनगरवर हल्ला चढविला होता. 
गाव उठवा नाहीतर घरे जाळू अशी आक्रमक व हिंसक भूमिका तेलंगणवासियांनी घेतल्यामुळे प्रेमनगरातील नागरिकांनी ते गाव सोडून माळरानावर बस्तान मांडले होते. तेलंगणच्या नागरिकांनी या गावावर आक्रमण करून विवाहाचा मंडपही पेटवून दिल्याची घटना घडली होती. यावेळी अख्या गावाला पोलीस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले होते.
तेलंगणाचे नागरिक पुन्हा हल्ला करतील या भयाने गावकऱ्यांनी गाव सोडून आपल्या गोठ्यात, शेतात वा नातेवाईकांकडे राहणे सुरू केले. 

थंडीचा कडाका सहन करीत लहान मुले, स्त्रिया व वृद्ध नागरिक उघड्या माळरानावर राहत आहेत. मात्र शनिवारी पहाटे गुणाबाई उत्तम जाधव यांचा आकस्मित मृत्यु झाला. त्या आपल्या शेतात राहत असल्याचे समजते. मृत्युचे कारण वृत्त लिहेपरियंत स्पष्ट झाले नव्हते.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.