चंद्रपूर /प्रतिनिधी:
चंद्रपूर
जिल्हयात केद्र व राज्य शासनाची प्रधानमंत्री बेटी पढाओ, प्रधानमंत्री
बेटी बचाओ या योजनेच्या नावाने कोणी दिशाभूल करत असेल तर त्याला बळीपडू
नये, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिका-यांनी केले आहे. अशा
प्रकारच्या योजनेसाठी पैशाची मागणी करणा-यांची तक्रार पोलीसात तक्रार
करण्याची सूचना त्यांनी केली आहे.
अशा प्रकारची कोणतीही योजना कार्यरत नसून याप्रकारची योजना असल्याबाबत
सांगून काही व्यक्ती व संघटना जन सामान्यात अपप्रचार करुन नागरिकांनाकडून
पैसे उकळण्याचा प्रकार सुरु असल्याच्या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. या
प्रधानमंत्री बेटी पढाओ, प्रधानमंत्री बेटी बचाओ, यानावाने योजना असल्याचे
सांगून जर कोणी व्यक्ती अथवा संघटना अपप्रचार करुन गैर फायदा घेतांना वा
फसवणूक करतांना आपले निदर्शनास आल्यास किंवा अशा योजनेचा फॉर्म भरण्यास्तव
कोणी आग्रह करीत असल्याचे निर्देश आल्यास सदर व्यक्ती वा संघटना यांचेबाबत
स्थानिक पोलिस ठाणे किंवा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, जुना
कलेक्टर बंगला,सिव्हील लाईन,दुरध्वनी क्रमांक 07172-255667 येथे संपर्क
साधवा असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विलास मरसाळे यांनी केले
आहे