সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Saturday, January 27, 2018

पोलीस भरती प्रशिक्षण केंद्रातून रोजगाराची संधी

चंद्रपूर/प्रतिनिधी:

इमेज परिणाम बल्लारपूर मतदार संघात शिक्षण, आरोग्य, पिण्याचे पाणी व रोजगार विविध विकास कामे केली जात आहेत़ परिसरातील युवकांना सैन्य व पोलीस भरतीसाठी प्रशिक्षण मिळावे़ या मतदार संघातील युवकांचे प्रतिनिधीत्व पोलीस भरतीमध्ये ठळकपणे उमटावे, यासाठी पोलीस प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे़, अशी माहिती वित्त, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. पोंभूर्णा येथे पाण्याच्या एटीएम मशीन लोकार्पण व डस्टबीन वितरण व इको पार्क लोकार्पण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते़
यावेळी वनविकास महामंडळ अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, आमदार अ‍ॅड़ संजय धोटे, नगराध्यक्ष हरीश शर्मा, पोंभूर्णा नगर पंचायतचे अध्यक्ष गजानन गोरंटीवार, उपाध्यक्ष ईश्वर नैताम, पंचायत समिती सभापती अल्का आत्राम, उपसभापती विनोद देशमुख, पंचायत समिती सदस्य ज्योती बुरांडे, गंगाधर मडावी, नगर पंचायत सभापती पुष्पा बुरांडे, नेहा बघेल, किशोर कावळे, अतिक कुरेशी, विजय कस्तूरे, मोहन चलाख, श्वेता वनकर, सुनिता मॅकनवार, रजिया कुरेशी,शारदा कोडापे, अमरसिंह बघेल, कल्पना गुरनुले, सविता गेडाम, जयपाल गेडाम, माधुरी चांदेकर,मुख्याधिकारी विपीन मुधदा, अभियंता राजेश सोनोने,प्रमोद कडू आदी उपस्थित होते.
ना़ मुनगंटीवार म्हणाले, पोंभूर्णा नगर पंचायतीच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला़ यातून विकासकामे गतीमान झाली आहेत़ सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी यापुढेही निधी देण्यात येणार असून, विकासापासून कोणताही समाजघटक वंचित राहणार नाही़ या मतदार संघाने मला मतरूपी आशिर्वाद दिल्यामुळे पाचव्यांदा विधानसभेत गेलो. मंत्री झालो. मला महाराष्ट्रभर सन्मान मिळत आहे. याची जाणीव ठेवून या मतदार संघातील प्रत्येक शहर व गावातील विकासासाठी प्रयत्न करीत आहे, असेही ना़ मुनगंटीवार यांनी नमूद केले़
पोंभूर्णा नगर पंचायतीचे महाराष्ट्रात नावे व्हाव़े अशी अपेक्षा व्यक्त करून पुढे म्हणाले, जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणी अभ्यासिका निर्माण केली जात आहे़ यातून गरीब व हुशार युवक-युवतींना तरुण विविध क्षेत्रात उच्च पदावर जाण्याची संधी मिळणार आहे़ या भागातील उमेदवारांनी सैन्यदल, पोलीस दल आणि अन्य विभागात भरती व्हावे, यासाठी लवकरच पोलीस प्रशिक्षण केंद्राची सुरुवात बल्लारपूर मतदार संघात करणार आहे़ सैन्य व पोलीस भरतीत या भागातील तरुणांची निवड व्हावी, यामागची आपली भूमिका असून रोजगार निर्मितीसाठी चांगल्या प्रशिक्षण संस्था उभारणार आहे, अशी ग्वाही पालकमंत्री मुनगंटीवार यांनी दिली़
पाटबंधारे विभागाच्या तलाव सौंदर्यीकरणाचे भूमीपूजनही यावेळी पार पडले़ मतदार संघात सुरू असलेल्या विविध विकास कामांचा आढावाही घेतला़ परिसरातील नागरिकांशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या़ कार्यक्रमाप्रसंगी नगर पंचायतीच्या पदाधिकाºयांनी स्थानिक समस्या सोडविण्यासाठी जादा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली़ विकासकामांच्या लोर्कापणप्रसंगी जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत आणि विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते़

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.