সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Tuesday, January 16, 2018

नाटकाच्या कणाकणात प्रतिरोध

confवर्धा/प्रतिनिधी:
 रंगमंच एक मोठी शक्ती आहे. समाज बदलण्याची ताकद नाटकांमधून प्रदर्शित होते. नाटकाच्या कणाकणात प्रतिरोध उपस्थित होतो. आजच्या काळात पथनाट्य आणि नाटकांमधून प्रतिरोधाचे स्वर मौन झालेले दिसून येत असून एक भयान शांतता अनुभवास येत आहे, असे प्रतिपादन अभिनेत्री उषा गांगुली यांनी केले.

इंटरनॅशनल फेडरेशन फॉर थिएटर रिसर्च (आईएफटीआर)ची भारतीय शाखा इंडियन सोसायटी फॉर थिएटर रिसर्च (आईएसटीआर) आणि विश्वविद्यालयातील प्रदर्शनकारी कला विभागाच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय रंगमंच संमेलन महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाच्या गालीब सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. सोमवारी या संमेलनाच्या उद्‍घाटनप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रो. गिरीश्वर मिश्र होते. व्यासपीठावर शाहीर संभाजी भगत, कुलसचिव कादर नवाज खान, आईएसटीआरचे संस्थापक अध्यक्ष प्रो. रवी चतुर्वेदी, संयोजक डॉ. सतीश पावडे, आईएसटीआरच्या महासचिव डॉ. विभा शर्मा उपस्थित होते. ‘प्रदर्शनासाठी प्रतिरोध किंवा प्रतिरोधाचे प्रदर्शन’ या विषयांवर संमेलनातील विविध सत्रांतून विचारविनिमय होणार आहे. रूसच्या डॉ. श्वेतलाना, पोलंडच्या जिस्ताना, पोर्टिलो मासिल, श्रीलंकाच्या थिलिनी दर्शनी मुनासिंघे यांच्यासह भारतभरातील रंगकर्मी, विद्यार्थी आणि शोधकर्ते सहभागी झाले आहेत.
कुलगुरू प्रो. गिरीश्वर मिश्र म्हणाले, समाजविकासाच्या प्रत्येक क्रमामध्ये संघर्ष होत राहिला आहे. संत कबीर हे या संघर्षाचे मोठे उदाहरण आहे. नाटकांना अधिक स्वायत्ततेची अधिक गरज आहे. कारण नाटक हे व्यापक समाजाचे प्रतिनिधित्व करते. नाटक हे आरशासमान असून समाजाची अनेक विद्यमान रूपे त्यातून स्पष्टपणे दिसून येतात, असेही त्यांनी सांगितले.

‘आंबेडकरी जलसा’चे प्रणेता शाहीर संभाजी भगत म्हणाले, प्रतिरोधाचे स्वर शंबुक, एकलव्य यांच्यापासून तर कबीर, रविदास, तुकाराम आणि संत नामदेव यांच्या काळातही राहिले आहेत. समाजातील अनेक घटकात कला विद्यमान आहे परंतु त्यांच्या प्रदर्शनासाठी संघर्ष करणारे दिसून येत नाहीत. आदिवासी आणि भटक्या जमातीमधील कलांच्या प्रदर्शनासाठी पुढे येण्याची आवश्यकता भगत यांनी प्रतिपादित केली.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.