সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Friday, January 26, 2018

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या टाईपरायटरची दुरुस्ती थांबली

नागपूर/प्रतिनिधी:

Dr. Babasaheb Ambedkar's Typewriter's repairs stopped | डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या टाईपरायटरची दुरुस्ती थांबली संविधानाची प्रस्तावना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या टाईपरायटरवर लिहिली, त्या टाईपरायटवर केमिकल ट्रीटमेंटचे काम मध्यवर्ती संग्रहालय (अजब बंगला) येथे लावण्यात येणाऱ्या कॅमेऱ्यामुळे थांबले आहे. बाबासाहेबांनी टाईपरायटरवर लिहिलेले संविधान राष्ट्राला अर्पण केल्यानंतर प्रजासत्ताक राष्ट्राची घोषणा करण्यात आली.

हे टाईपरायटर चिचोली येथील संग्रहालयात ठेवण्यात आले आहे. संग्रहालयातील टाईपरायटर खराब झाले आहे. येथील वस्तूंना नष्ट होण्यापासून वाचविण्यासाठी व संरक्षणासाठी कमिटीचे सचिव संजय पाटील यांचे प्रयत्न सुरू आहे. २०१३-१४ सरकारने बाबासाहेबांच्या वस्तूंच्या संरक्षणासाठी ४० लाख रुपयांच्या निधीची तरतूद केली होती. त्याचबरोबर नासुप्रच्या माध्यमातून बाबासाहेबांचे कपडे, पेन, घड्याळ, भांडे व अन्य साहित्यासह टाईपरायटरला केमिकल ट्रीटमेंटचे काम नॅशनल रिसर्च लेबॉरेटरी फॉर कन्झर्व्हेशन गव्हर्नमेंट आॅफ इंडिया (लखनौ) यांना देण्यात आले होते. या ऐतिहासिक वस्तूंच्या ट्रीटमेंटसाठी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सिव्हील लाईन येथील मध्यवर्ती संग्रहालयात जागा देण्यात आली आहे. अजब बंगल्यातील दुसऱ्या माळ्यावर कॅमेऱ्याच्या देखरेखीत एनआरएलसीच्या टीमने लॅब बनवून अनेक वस्तूंवर ट्रीटमेंट करून त्यांना संरक्षित केले आहे. दीड महिन्यापूर्वी संविधानाची प्रास्ताविका लिहिणाऱ्या टाईपरायटरचे काम सुरू करण्यात आले होते.
 संरक्षक सोनटक्के हे संग्रहालयाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संपूर्ण परिसरात कॅमेरे लावत आहे. परंतु ट्रीटमेंट लॅबमध्ये कॅमेरे लावण्यास त्यांना नकार मिळाला आहे. एनआरएलसीच्या टीमच्या मते लॅबमध्ये गुप्त पद्धतीने वस्तूंना केमिकल ट्रीटमेंट करण्यात येते. लॅबमध्ये कॅमेरा लावल्यास त्यातील गोपनीयता भंग होऊ शकते. परंतु संग्रहालय प्रशासन स्वत:ची इमारत असल्याने लॅबच्या आतमध्ये कॅमेरे लावण्यावर अडले आहे. त्यामुळे टीमने टाईपरायटरवर केमिकल ट्रीटमेंटचे काम बंद केले आहे. यासंदर्भात टीमने एनआरएलसीचे संचालक जनरल बी.वी. खरबडे यांना सूचना दिली आहे. त्यांनी राज्य संग्रहालयाचे संचालक तेजस गर्ले यांना पत्र देऊन लॅबच्या आतमध्ये कॅमेरे लावण्यास आक्षेप घेतला आहे. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारच्या दोन विभागातील अधिकारी आपापल्या निर्णयावर ठाम असल्याने, टाईपरायटरची केमिकल ट्रीटमेंट थांबली आहे.
गोपनीयता कायम राहील
मध्यवर्ती संग्रहालयाचे संरक्षक विराज सोनटक्के यांच्या मते एनआरएलसीच्या ट्रीटमेंटच्या कामामध्ये आम्ही कुठलीही दखल देत नाही. सरकारी आदेशानंतर संग्रहालयाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ११० कॅमेरे लावण्यात येत आहे. लॅबमध्ये या वस्तूंच्या ट्रीटमेंटच्या कामात गोपनीयता भंग होणार नाही, याची लेखी गॅरंटी देण्यास तयार आहोत. काही शंका असल्यास एनआरएलसीच्या टीमने आमच्याशी चर्चा करावी.
लॅबच्या आत कॅमेरे लावणे चुकीचे
एनआरएलसी (लखनौ) चे डीजी बी.बी. खरबडे यांच्या मते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वस्तू देशासाठी ऐतिहासिक वारसा आहे. त्याचबरोबर ट्रीटमेंटची प्रक्रिया गोपनीय ठेवावी लागते. लॅबच्या आतमधील सर्व वस्तूंच्या सुरक्षेची जबाबदारी आमची आहे. लॅबच्या बाहेर सीडीपासून दरवाजापर्यंत कॅमेरे लावल्यास आमचा आक्षेप नाही. परंतु कॅमेऱ्याच्या माध्यमातून कामात हस्तक्षेप आम्हाला मंजूर नाही.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.