वरोरा/ प्रतिनिधी:
संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र राज्य विदुयत
वितरण कंपनी द्वारे 11जानेवारी ये 17 जानेवारी 2017 या काळात विद्युत
सप्ताह साजरा केल्या जात असताना वरोरा शहरात सुद्धा आज दि.13 ला महाराष्ट्र
राज्य विदुयत वितरण कंपनी वरोरा द्वारे जनजागृती रॅली व विदुयत सुरक्षा
देखावे काढून ही रॅली शहरात काढण्यात आली या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती
मनहून उद्योग,ऊर्जा व कामगार चंद्रपूर विभागाचे विदुयत निरीक्षक प्रदीप
चामट उपस्थित होते.
महाराष्ट्रभर
11 जानेवारी ते 17 जानेवारी हा काळ विदुयत सप्ताह मनहून साजरा केल्या जात
असतो.याच अनुषंगाने आज सकाळी विदुयत वितरण कंपनी वरोराच्या कार्यलयापासून
सकाळी 9 वाजता विदुयत सुरक्षा या विषयाशी निगडित असणारी भव्य रॅली काढण्यात
आली या रैली मध्ये विदुयत सुरक्षा बाबतीतील देखावे बनविण्यात आले
होते,सुरक्षा बाबत फलके, घोष वाक्य द्वारे ही रैली शहरातून काढण्यात आली
होती.या रैली मध्ये विदुयत विभागाचे अधिकारी,कर्मचारी व कंत्राटदार उपस्थित
होते.या रैलीची सांगता कटारिया मंगल कार्यालय मध्ये करण्यात
आली.याकार्यलयात जी.यम. आर.कंपनीच्या अग्निशामक दलाद्वारे आग लागल्यास
त्यावर कश्या प्रकारे नियंत्रण करायचे याबाबत सर्व कर्मचारी व नागरिकान्हा
प्रात्यक्षिक करून दाखविले.या कार्यक्रमाच्या यशस्विते करिता मुख्य
अभियंता विनोद भोयर व त्यांच्या सहकारी अधिकारी व कर्मचारी यानही अथक
परिश्रम घेतले.