चंद्रपूर
शहर महानगर पालिकेअंतर्गत थकबाकीदारांविरोधात जप्ती ची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत झोन क्रमांक १ मित्रनगर वार्डात मनपाने शंकरराव मेदीलाल
मोरे यांच्याकडे ४ वर्षांपासून थकबाकी असून वारंवार थकबाकीची मागणी मनपाने
केली असता थकबाकी न भरल्याने त्यांच्या दुकानाला सील ठोकून जप्तीची कारवाई
केली आहे. मित्र नगरात शंकरराव मेदीलाल मोरे यांचे दुकान आहे.
मनपाच्या अधिकाऱ्याने वारंवार थकबाकीची मागणी केली असता तुम्ही इकडे या आणि
उपायुक्तांना इकडे घेऊन या तेवाच मी कराचा भरणा करेन व अरेरावीची भाषा
सुद्धा वापरली. त्यामुळे मनपाच्या अधिकाऱ्यांनी येथे पोहोचून धडक कारवाई
करत शंकरराव मेदीलाल मोरे यांचा दुकानाला सील ठोकले आहे. ४ वर्षांपासून
त्यांच्याकडे ३७ हजार चारशे ९६ रुपये इतकी थकबाकी बाकी होती. महानगर
पालिकेतर्फे अनेकदा कराचा भरणा लवकरात लवकर करावा असे आवाहन करण्यात येत
असताना सुद्धा कराचा भरणा लवकरात लवकर न केल्याने हि कारवाई केल्याचे
सांगितले आहे. हि कारवाई बंडू वासेकर, भाऊराव सोनटक्के व इतर अधिकाऱ्यांनी
केली आहे.
Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.
शहरात शनिवारी आणि रविवारी जनता कर्फ्यू
-
जनप्रतिनिधींचे मागणीवर महापौर संदीप जोशी यांचे आवाहन : शुक्रवारी रात्री
९.३० ते सोमवार सकाळी ७.३० पर्यंत नागरिकांना घरातच राहण्याची विनंती नागपूर,
ता. १६...
परमात्मा एक मानव धर्म पावडदौणा, मौदा मौदा येथे महानत्यागी बाबा जुमदेवजीचे भव्य आश्रम मौदा येथे बाबांचे भव्य असे परमात्मा एक सेवक मानव धर्म आश्रम बनविण्यात आले आहे. याची स्थापना दि. २१ जून १९९८ ला २५ एकर जागेमध्ये करण्यात आली. या आश्रमाचे महात्मेय व उद्दीस्त बघून महाराष्ट्र शासनाने दि. १३ नोव्हेंबर २००९ रोजी राज्य निकष समिती, मंत्रालय मुंबई यांच्या बैठकीत झालेल्या ठरावाप्रमाणे तसेच ग्रामविकास व जलसंशाधन विभाग मंत्रालय मुंबई यांचे दि १७ डिसेंबर २००९ पत्र क्र. तीर्थवी २००९ प्र. क्र. ५३ योजना ७ नुसार राज्यस्तरीय तीर्थ क्षेत्र ब वर्ग स्थळ म्हणून घोषित करण्यात आले. महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचे महापरिनिर्वानंतर मंडळाच्या वतीने मानव धर्माचा प्रचार व प्रसार करण्यात येत असून त्याच्या महान समाज कार्याला विनम्र अभिवादन करून त्याच्या समाज कार्याचा वारसा पुढे चालविण्याकरिता व त्याच्या सामाजिक कार्याच्या स्मुर्ती जागविण्याकरिता वर्षातून एक दिवस मानव धर्माचे सर्व सेवक बांधव एकत्रित यावे म्हणून बाबांच्या आदेशानुसार प्...
महाराष्ट्राच्या पूर्वेकडील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांचा भूभाग 'झाडीमंडळ' किंवा 'झाडीपट्टी' या नावाने ओळखला जातो. या प्रदेशात बोलली जाणारी मराठी भाषेची बोली ' झाडीबोली' या नावाने प्रचलित आहे. आज या चार जिल्ह्यांशिवाय या जिल्ह्यांच्या उत्तर व पूर्व सीमेवरील मध्य प्रदेशातील बालाघाट, दुर्ग व राजनांदगाव या जिल्ह्यांचा काही भाग आणि भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यांच्या पश्चिम सीमेवरील नागपूर जिल्ह्याचा काही भाग यांचा झाडी भाषक प्रदेश म्हणून समावेश करावा लागतो. झाडीपट्टीच्या चार जिल्ह्यांतील बावन्न लक्ष आणि सीमाप्रदेशातील दहा लक्ष असे एकूण बासष्ट लक्ष भाषक झाडीबोली बोलतात. विदर्भातल्या शेतकर्यांकचं या रंगभूमीवर अलोट प्रेम आहे. त्यांनी त्यांची ही रंगभूमी टिकून राहण्यासाठी अथक प्रयत्न केलेले आहेत, या रंगभूमीवर काही ग्रुप्स १०० वर्षांपेक्षा जास्त काळ आपली कला सादर करीत आहेत. तमाशा, गोंधळ, दांढर, छत्तीसगडी नौटंकी आणि घोटुल यांचा झाडीपट्टी थिएटरवर विशेष प्रभाव आहे. ही नाटकं जंगलातल्या (झाडी) एका मोकळ्या भागात (पट्टी) केली जातात, म्हणूनच या रंग...
चंद्रपूर- विदर्भातील ज्येष्ठ नाट्यकलावंत, दिग्दर्शक, नाट्यलेखक आणि चित्रकार सदानंद बोरकर यांना यावर्षीचा वसंत सोमण रंगकर्मी पुरस्कार जाहीर झाला आहे. ज्येष्ठ नाटककार रत्नाकर मतकरी यांनी मुंबईत या पुरस्काराची अधिकृत घोषणा केली. मुंबई येथील दादर-माटुंगा कल्चरल सेंटर येथे २ ऑगस्ट रोजी आयोजित कार्यक्रमात सदानंद बोरकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. १० हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. बोरकर यांनी ‘माझं कुंकू मीच पुसलं’, ‘आत्महत्या’, ‘हा खेळ सावल्यांचा’, ‘नवरे झाले बावरे’ यासह अनेक सामाजिक नाटके लिहिली आहेत. ‘माझं कुंकू मीच पुसलं’ या नाटकाचा विद्यापीठाच्या एम. ए. या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला असून, ‘आत्महत्या’ हे नाटक २००९ मध्ये सार्क इंटरनॅशनल इअरचे नामांकन तसेच ज्युनिअर चेंबर इंटरनॅशनल च्या राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी ठरले आहे. नाट्यक्षेत्रातील प्रतिष्ठित पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्वच क्षेत्रातून अभिनंदन केले जात आहे.