चंद्रपूर मनपाच्या नगरोत्थान निधीचा वाद संपता संपेना बुधवारी मनपाच्या सभागृहात आमसभेचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी नगरोत्थान निधीचा विषय, अंबुजा कंपनी कचरा प्रक्रिया विषय, सराई मार्केट या विविध विषयांवर सभागृहातील वेलमध्ये जाऊन चांगलाच गदारोड बघायला मिळाला. सत्ताधार्यांनी नगरोत्थान निधी स्वत:च्या प्रभागात पळविळ्याचा आरोप बसपा गटनेता अनिल रामटेके यांनी केला आहे, यात विरोधकांनी वेलमध्ये येऊन संपूर्ण पदाधिकार्यांसमोर ठिय्या देत तीव्र निषेध नोंदविला.
मनपाच्या आमसभेत पप्पू देशमुखांचे "अंबुजा गो बॅक"
बुधवारी झालेल्या मनपाच्या आमसभेत अंबुजा सिमेंट कंपनीला चंद्रपूर शहराच्या कंपोस्ट डेपोतील कचरा देण्याचा विषय अजेंड्यावर होता. शहर विकास आघाडीचे गटनेते तसेच प्रहार संघटना जिल्हाध्यक्ष नगरसेवक पप्पू देशमुख यांनी या संदर्भात एक पत्र देखील महापौर अंजली घोटेकर यांच्या नावे लिहले होते. उपरवाही ग्रामसभेने अंबुजामध्ये प्लास्टिक व कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येते.यामुळे दुर्गंधी व अनारोग्य पसरत असल्याने कंपनीविरोधात कारवाई करण्यात यावी असा ठराव उपरवाही ग्रामसभेत घेण्यात आला होता.या ठरावाची प्रत देशमुख यांनी महापौर यांना दिलेल्या तक्रारीसोबत जोडलेली होती.या तक्रारी च्या प्रत देशमुख यांनी सर्व नगरसेवकांना देऊन सहकार्य करण्याची विनंती सुध्दा केली होती.चंद्रपूर मनपाचे सर्व पदाधिकारी, सदस्य व प्रशासन स्वच्छतेच्या बाबतीत उल्लेखनीय कार्य करीत असतांना अश्या बेजाबदार पाने काम करणाऱ्या व नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणणाऱ्या तसेच गोरगरीब ग्रामीण लोकांच्या आरोग्यास धोका निर्माण करणाऱ्या कंपनीला प्रक्रीया करण्यासाठी कचरा देणे चंद्रपूर मनपासाठी भूषणावह ठरणार नाही अशी भूमिका नगरसेवक पप्पू देशमुख त्यांनी मांडली होती. हा विषय आमसभेत चर्चेला आल्यानंतर देशमुख व अन्य काही नगरसेवकांनी अंबुजा "गो बॅक" चे नारे दिले व त्यानंतर सर्वानुमते अंबुजाला कचरा देण्याचा ठराव रद्द करण्यात आला.
वडगाव प्रभागातील दत्त नगरला नगरोत्थानमधून डावलल्याचा निषेध..
शहरातील वडगाव प्रभाग हा एक महत्वाचा प्रभाग गणल्या जातो.वडगाव प्रभागातील दत्त नगरमध्ये 900 च्या वर लोक वास्तव्यास आहे. या प्रभागात गेल्या 20 वर्षापासून रस्ते,नाल्या यासोबतच अनेक विकासकामे झालेली नाहीत.२०१७-२०१८ या वर्षासाठी आलेल्या नगरोत्थानमधेही दत्त नगरला वगळण्यात आले.याचाही नगरसेवक देशमुख यांनी महापौर यांच्या डायस समोर जाऊन निषेध केला.
सराई मार्केटची ईमारत ठाकूर यांच्या संस्थेला देण्यास नगरसेवकांचा विरोध.
चंद्रपूर शहरातील जटपुरा गेट येथील महानगर पालिकेच्या मालकीची ६३४९.५९ चौरस मीटर मध्ये असणारी इमारत गेल्या काही वर्षापासून जीर्ण अवस्थेत आहे, जुन्याकाळी हि ईमारत धर्मशाळा म्हणून वापरली जात होती. सध्या हि ईमारत भग्नावस्थेत असल्याने इंडिअन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चर हेरिटेज चालविणाऱ्या ईतिहासकार अशोकसिंग ठाकूर यांनी हि ईमारत त्यांच्या संस्थेला मिळावी यासाठी मनपात २६ डिसेंबर २०१७ ला अर्ज केला होता. अशोकसिंग ठाकूर हे पुरततव जाणकार असून ते विविध विषयांवर प्रदर्शनी भरवित असतात. मनपाने हा विषयाला २८ डिसेंबरला सर्वसाधारण सभेत मंजुरी देखील प्रधान करण्यात आली होती. मात्र काही नगरसेवकांनी शासनाची ऐतिहासिक ईमारत एका अशासकीय संस्थेला देण्यात येऊ नये यासाठी विरोध दर्शविला. तर पप्पू देशामुख यांनी या ऐतिहासिक इमारतीला जर मनपा कोणाला देत नसेल तर या ईमारतीला विकसित करत त्यात राणी हिराईचे संग्रहालय बनविण्यात यावे अशी मागणी यावेळी केली.