स्वच्छ सर्वेक्षणात मदत व्हावी या अनुशंघाने ब्रम्हपुरी नगरपालिकेतील एकाने व्हाट्सअप ग्रुप तयार केला . पालिकेच्या कामकाजाविषयी सर्वजण अवगत व्हावे, हाही या ग्रुप तयार करण्यामागील उद्देश. मात्र एका आंबटशौकीन ग्रुप सदस्याला ग्रुप तयार करण्यामागील गांभीर्य व ग्रुपच्या मर्यादेचे भान राहिले नाही. ग्रुपमध्ये महिला असतानाही या आंबटशौकिनाने चक्क सात-आठ अश्लिल पॉर्न व्हिडीओ ग्रुपवर वायरल केले हे प्रकरण आता थेट पोलीस स्टेशनच्या दारी पोहचले आहे. या प्रकाराबाबद नगरसेवक सुधीर राऊत यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे
सध्या सर्वत्र स्वच्छ सर्वेक्षण २०१८ चे वारे वाहत आहेत प्रत्येक पालिका अहोरात्र मेहनत घेत आहे.आशतच ब्रम्हपुरी नगरपरिषद देखील कामाला लागली आहे . ब्रह्मपुरीला चांगला क्रमांक मिळून शहर स्वच्छ व सुंदर व्हावे, यासाठी नगरसेवकांनीही पालिका पदाधिकारी या नात्याने आपले कर्तव्य बजावावे, असा पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मानस आहे

यासाठी एक व्हॉट्स अॅपवर एक ग्रुप तयार केला. पालिकेतील अधिकारी, कर्मचारी व नगरसेवकांना यात समाविष्ट केले. यात महिलांचाही समावेश आहे, कुठल्याही मुद्यावर निष्पक्ष चर्चा व्हावी, पालिकेच्या कामकाजाविषयी सर्वजण अवगत व्हावे, हाही या ग्रुप तयार करण्यामागील उद्देश. मात्र एका आंबटशौकीन ग्रुप सदस्याला ग्रुप तयार करण्यामागील गांभीर्य व ग्रुपच्या मर्यादेचे भान राहिले नाही. ग्रुपमध्ये महिला असतानाही या आंबटशौकिनाने चक्क सात-आठ अश्लिल पॉर्न व्हिडीओ ग्रुपवर वायरल केले.
अश्लिल व्हिडोओ ग्रुपवर येताच प्रथम ग्रुपमधील पालिका अधिकारी, कर्मचारी आणि नगरसेवकांमध्ये आणि नंतर याची सर्वत्र चर्चा होताच संपूर्ण ब्रह्मपुरीतच खळबळ उडाली.रविवारी शहरात दिवसभर नगरपालिकेच्या या ग्रुपची व त्यातील पोस्टचीच चर्चा सुरू राहिली. याबाबत नगरसेवक सुधीर राऊत यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत त्यांनी ग्रुप मधील महिलांना मानसिक तसेच नाहक प्रकारची हानी सहन करावी लागली असे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. दोषींवर तात्काळ कारवाई करावी असेदेखील त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.