সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Saturday, January 20, 2018

पांढरा कापूस काळवंडला

चंद्रपूर-  अनेकजण भोयगाव ते गडचांदूर या मार्गाचा वापर करतात. त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते.मात्र वाहन गेल्यानंतर उडणाऱ्या धुळीमुळे परिसरातील शेतात असलेला पांढरा कापूस पूर्णपणे काळवंडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
अर्धनग्न आंदोलनाचा इशारा
सदर रस्त्याची दुरुस्ती करण्याच्या मागणीसाठी काँग्रेस, शेतकरी संघटनेने अनेकदा आंदोलन केले. मात्र शासनाने रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात डांबर टाकण्याऐवजी लाल माती टाकली. मात्र धुळीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याने सदर रस्त्याची आठवडाभरात दुरुस्ती करावी, अन्यथा अर्धनग्न आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघटनेने दिला आहे.
नादुरुस्त रस्त्यामुळे बसफेऱ्या बंद
रस्त्याची दुरवस्था बघून एसटी महामंडळाने भोयगाव-गडचांदूर या रस्त्यावरील अनेक बसेस बंद केल्या आहेत. त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांचा तसेच प्रवाशांना मोठी अडचण जात आहे. परिणामी प्रवशांना तिप्पट पैसे देऊन खासगी वाहनांचा वापर करावा लागत आहे.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.