उमरेड/वार्ताहर:
उमरेड तालुक्यातील लोहारा गावाजवळ रविवार १४ जानेवारी रोजी सकाळी ७.३० ते ८ वा. दरम्यान दोन शेतकरी व बिबट्याच्या झुंजीमध्ये बिबट्याचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी रवींद्र भाऊराव ठाकरे रा. लोहारा व राजेंद्र देवनाथ ठाकरे रा. खुर्सापार येथील रहिवासी असून या दोघांचीही शेती लोहारा जंगलाला लागून आहे. रोजच्याप्रमाणे दोघेही रात्री आपआपल्या शेतामध्ये पिकांची पाहणी करण्याकरिता गेले होते. दिवस उजाळल्यानंतर रवींद्र ठाकरे यांना एक बिबट त्यांच्या शेतातील मालकीच्या बैलावर हल्ला करताना दिसला.
हे दृष्य पाहून त्याने काहीही एक विचार न करता वाघाच्या दिशेने धाव घेतली. मिळेल त्या साधणांनी वाघाला हाकलून लावले. परंतु, थोड्याच वेळात परत वाघाने रवींद्रवर हल्ला चढविला व त्याला गंभीर जखमी केले. तेव्हा रविंद्रची आरडा ओरडा पाहून बाजूच्या शेतात असलेला राजेंद्र हा रवींद्रच्या दिशेने धावला व मिळेल त्या वस्तुने वाघाच्या शरीरावर मारणे सुरू केले. या झटापटीत रवींद्रला बिबट्याने जखमी केले. मदतीला राजेंद्र धावून आला. बैल, शेतकरी रवींद्र व बिबट्याच्या जीवघेण्या झुंजीमध्ये दोन्ही शेतकºयांनी आपली सुटका केली. परंतु ,त्यांच्या झुंजीमध्ये वाघाचा मृत्यू झाला. बिब्याचे वय अंदाजे ३ ते ४ वर्षे असल्याचे समजते. तेव्हा काही वेळेने ही बातमी गावामध्ये वाºयासारखी पसरली. यानंतर गावकºयांनी त्याठिकाणी धाव घेवून दोन्ही जखमी शेतकºयांना नागपूर येथील रुग्णालयात हलविले.
थोड्याच वेळात उमरेड येथील वनविभागाचा चमु व पोलिस पथक दाखल झाले. पंचाच्या उपस्थितीत वाघाचा पंचनामा करुन लोहारा जवळील नर्सरीमध्ये वाघावर अग्नीसंस्कार करण्यात आले. परंतु या घडलेल्या घटनेमुळे गावातील सर्व नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून शेतातील पिकाची व आपल्या पाळीव प्राण्याचे काय होणार असा प्रश्न नागरिकांसमोर पडला असून वनकर्मचारी कर्मचारी फक्त पाहण्याचीच भूमिका घेणार की काही करणार असा प्रश्न जनतेसमोर पडला आहे.