वार्ताहर / रामटेक
रामटेक येथील नेहरू ग्राऊंड येथे कालिदास राष्ट्रीय लोकमहोत्सव आणि आदिवासी संस्कृती पर्व थाटात झाला. दोन दिवस चाललेल्या या महोत्सवास रसिकांनी दमदार हजेरी लावली. तरुणांची अफाट गर्दी या लोकोत्सवाने अनुभवली. गणेशवंदनेपासून सुरू झालेला कार्यक्रम आणि राजस्थानी लोकनृत्याने झालेला समारोप रसिकांना अपूर्व आनंद देणारा ठरला.
या महोत्सवात राजस्थान येथील मांगणी, कालबेलिया, छत्तीसगढ येथील पंथी लोकनृत्य, मध्यप्रदेशातील सैला करमा, गुदुमबाजा वाघ तसेच महाराष्ट्रातील पोवाडे, नृत्य, लावणी, सोंगीमुखवटे, परधान ढेमसा, नृत्य व खडीगंमत यांनी रामटेककर रसिकांना मंत्रमुग्ध करून सोडले. प्रशासनाने अतिशय चोख तयारी व बंदोबस्त ठेवला होता. रसिकांसाठीही सुविधा होती. या महोत्सवाचा रामटेककर रसिकांनी मनमुराद आनंद लुटला.
कार्यक्रम उत्कृष्टपणे पार पाडण्यासाठी विभागीय आयुक्त अनुपकुमार, आमदार डी. मल्लिकार्जून रेड्डी, उपविभागीय अधिकारी राम जोशी, तहसीलदार धर्मेश पुसाटे, लोहीत मनानी, उपविभागीय पोलिस अधिकारी योगेश पारधी, पोलिस निरिक्षक, खंडविकास अधिकारी बी. डब्ल्यू यावले तसेच विविध विभागाचे अधिकारी व कर्मचार्यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचा रामटेककर रसिकांनी मनमुराद आनंद लुटला. इतिहास रसिकप्रेमी मागणीमुळे तसेच आमदार डी. मल्लीकार्जून रेड्डी यांनी सतत पाठपुरावा व कृतीशील प्रयत्न केल्यामुळे आणि आयुक्त अनुपकुमार यांनी व संपूर्ण प्रशासनाने केलेल्या नियोजनबद्ध आखणीतून रामटेककरांना कालिदास महोत्सवाचा अपूर्व आनंदाचा लाभ मिळाला. अखेर आयुक्त अनुपकुमार यांनी रामटेकचे वैभव कालिदास महोत्सवाचे आयोजन यशस्वीपणे रामटेकला करून एकप्रकारे रामटेककर रसिकांचा भावनाचा आदर व सम्मान केल्याचे चित्र दिसून आले. दरवर्षी नवनवीन संकल्पना घेऊन साजरा होणारा कालिदास महोत्सव यावर्षी आदिवासी लोकसंस्कृतीच्या दर्शनाने नटलेला होता. विभिन्न नृत्यकलांचा आस्वाद घेताना रसिक प्रेक्षकांनी कौतुक केले तसेच आभार मानले. आमदार डी. मल्लीकार्जून रेड्डी, विभागीय आयुक्त अनुपकुमार व उत्तम नियोजन करून रंगारंग कार्यक्रम सादर करण्याकरिता संपूर्ण कार्यरत असणार्या प्रशासकीय विभागाचे उपविभागीय अधिकारी राम जोशी, माजी आमदार आनंदराव देशमुख, माजी आमदार आशीष जयस्वाल, न. प. उपाध्यक्ष कविता मुलमुले, तहसीलदार धर्मेश पुसाटे, खंडविकास अधिकारी बी. डब्ल्यू यावले, चंद्रपाल चौकसे, सदानंद निमकर, अशोक बर्वे, न. प. रामटेकचे सदस्य, रामटेक नगरीतील गणमान्य नागरिक, इतिहासप्रेमी व रसिकांची यावेळी अफाट गर्दी होती. कालिदासांची प्रतीकृती असलेली रांगोळी प्रवीणा र्मजीवे यांनी उत्कृष्टपणे काढली. त्यामुळे कालिदास महोत्सवात मान्यवरांतर्फे त्यांचा गौरव करण्यात आला.