तुम्ही बांगलादेशचे रहिवासी आहात, आम्ही तुम्हाला पकडून नेऊ अशी धमकी देऊन बौध्द भंतेकडून खंडणी वसूल केली. हा खळबळ जनक प्रकार जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला. या प्रकरणी भंतेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी एका विधीसंघर्ष बालकासह तिघांना ताब्यात घेतले. सूरज सुभाष नागदिवे (२0, रा. घोरपड, त. कामठी), अभिषेक संजय शेलारे (१८, रा. यशोधरानगर) अशी खंडणीबाज आरोपींची नावे आहेत.
रायगढ जिल्हय़ातील (प. बंगाल) बौद्ध भंते शंकर अमिरत चौधरी (५0) हे पारस ता. दौंड (पुणे) येथील शांती बुद्ध विहार येथे राहतात. बौद्ध धम्माचा प्रसार- प्रचार करण्यासाठी नागपुरात आले होते. नागपुरात त्यांचा मुक्काम पिवळी नदी येथील धम्मक्रांती बुद्ध विहारात आहे. रविवार १४ जानेवारी रोजी दुपारी ४ च्या सुमारास शंकर हे बुद्ध विहारात आराम करीत होते. त्यावेळी सूरज, अभिषेक आणि विधीसंघर्ष बालक हे तेथे आले. सूरज व अभिषेक यांनी शंकर यांना तुम्ही बांगलादेशचे रहिवासी आहात. आम्ही सीआयडी पोलिस आहोत. तुम्हाला पकडून नेऊ अशी दमदाटी केली. त्यामुळे शंकर घाबरले. शंकर यांनी आम्ही भारताचेच रहिवासी आहोत असे सांगितले. त्यावर तिघांनीही कारवाई न करण्यासाठी ५0 हजाराची मागणी केली. शंकरजवळ पैसे नसल्याने त्यांनी असर्मथता दर्शविली. त्यावर तिघांनीही त्यांना मारण्याची धमकी देत तुमच्याजवळील एटीएममधून पैसे काढून द्या असे म्हटले. त्यानंतर शंकर व त्यांच्यासोबत राहणारे शुभ भंते यांना ऑटोत बसवून राणी दुर्गावती चौकातील सेंट्रल बँकेच्या एटीएममध्ये नेले. शंकर यांनी त्यांच्या खात्यातून २0 हजार तर शुभ भंतेच्या खात्यातून १५ हजार रुपये असे ३५ हजार रुपये काढून त्यांना दिले. त्यानंतर दोन्ही भंतेंना बुद्ध विहारात आणून सोडले आणि ते पसार झाले.
आपल्याला गंडविण्यात आल्याचे भंते शंकर यांच्या लक्षात येताच त्यांनी जरीपटका पोलिस ठाणे गाठून तक्रार केली. माहिती मिळताच पोलिस निरीक्षक उत्तम मुळक, हेड कॉन्स्टेबल मुन्ना ठाकूर, शिपाई गणेश बरडे, आसीफ शेख, रवींद्र भंगाडे हे आरोपीच्या शोधासाठी रवाना झाले. पोलिसांनी तिघांचाही शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर सूरज आणि अभिषेक यांना अटक केली.
Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.
LSG vs MI: लखनऊचा मुंबईवर १२ धावांनी विजय
-
लखनऊ: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या आजच्या १६व्या सामन्यात लखनऊ
सुपरजायंट्सने मुंबई इंडियन्सवर १२ धावांनी विजय मिळवला आहे. २०३ धावांच्या
आव्हानाला प्रत्युत्...
शहरात शनिवारी आणि रविवारी जनता कर्फ्यू
-
जनप्रतिनिधींचे मागणीवर महापौर संदीप जोशी यांचे आवाहन : शुक्रवारी रात्री
९.३० ते सोमवार सकाळी ७.३० पर्यंत नागरिकांना घरातच राहण्याची विनंती नागपूर,
ता. १६...
परमात्मा एक मानव धर्म पावडदौणा, मौदा मौदा येथे महानत्यागी बाबा जुमदेवजीचे भव्य आश्रम मौदा येथे बाबांचे भव्य असे परमात्मा एक सेवक मानव धर्म आश्रम बनविण्यात आले आहे. याची स्थापना दि. २१ जून १९९८ ला २५ एकर जागेमध्ये करण्यात आली. या आश्रमाचे महात्मेय व उद्दीस्त बघून महाराष्ट्र शासनाने दि. १३ नोव्हेंबर २००९ रोजी राज्य निकष समिती, मंत्रालय मुंबई यांच्या बैठकीत झालेल्या ठरावाप्रमाणे तसेच ग्रामविकास व जलसंशाधन विभाग मंत्रालय मुंबई यांचे दि १७ डिसेंबर २००९ पत्र क्र. तीर्थवी २००९ प्र. क्र. ५३ योजना ७ नुसार राज्यस्तरीय तीर्थ क्षेत्र ब वर्ग स्थळ म्हणून घोषित करण्यात आले. महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचे महापरिनिर्वानंतर मंडळाच्या वतीने मानव धर्माचा प्रचार व प्रसार करण्यात येत असून त्याच्या महान समाज कार्याला विनम्र अभिवादन करून त्याच्या समाज कार्याचा वारसा पुढे चालविण्याकरिता व त्याच्या सामाजिक कार्याच्या स्मुर्ती जागविण्याकरिता वर्षातून एक दिवस मानव धर्माचे सर्व सेवक बांधव एकत्रित यावे म्हणून बाबांच्या आदेशानुसार प्...
पोळ्याच्या दिनी 'झडत्या'ची लोकसंस्कृती शेतकर्यांचे वैभव असलेला बैलांचा दिवस म्हणजे पोळा. वर्षभर राबणार्या बैलांची पिठोरी अमावश्येच्या दिवशी पूजा करून कृतज्ञता व्यक्त करणारा पोळा हा सण उत्साहाने साजरा केला जातो. पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांच्या खांदे शेकणीचा कार्यक्रम असतो. बैलांचे खांदे तूप किंवा तेल, हळद लावून शेकतात. 'आज आवतन घ्या अन् उद्या जेवायला या' या शब्दात बैलांना पोळ्याचे आमंत्रण दिले जाते. 'वाटी रे वाटी खोबर्याची वाटी, महादेव रडे दोन पैशासाठी, पारबतीच्या लुगड्याले छप्पन गाठी, देव कवा धावला गरिबांसाठी' एक नमन गोरा पार्वती, हर बोला हर-हर महादेव'. एक नमन गोरा पार्वती, हर बोला हर-हर महादेव | Har Har Mahadev Khabarbat™ https://www.khabarbat.in › 2013/09 एक नमन गोरा पार्वती , हर बोला हर - हर महादेव | Har Har Mahadev ... पोळ्याचा आनंद शेतकर्यांसाठी सुखदायक असतो. या पारंपरिक सणाचे स्वरूप ... पोळ्याचा आनंद शेतकर्यांसाठी सुखदायक असतो. या पारंपरिक सणाचे स्वरूप बदलत चालले असले तरी ग्रामीण भागात पोळ्याच्या दिवशी झडत्यांची लोकसंस्कृती आजही काय...
महाराष्ट्राच्या पूर्वेकडील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांचा भूभाग 'झाडीमंडळ' किंवा 'झाडीपट्टी' या नावाने ओळखला जातो. या प्रदेशात बोलली जाणारी मराठी भाषेची बोली ' झाडीबोली' या नावाने प्रचलित आहे. आज या चार जिल्ह्यांशिवाय या जिल्ह्यांच्या उत्तर व पूर्व सीमेवरील मध्य प्रदेशातील बालाघाट, दुर्ग व राजनांदगाव या जिल्ह्यांचा काही भाग आणि भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यांच्या पश्चिम सीमेवरील नागपूर जिल्ह्याचा काही भाग यांचा झाडी भाषक प्रदेश म्हणून समावेश करावा लागतो. झाडीपट्टीच्या चार जिल्ह्यांतील बावन्न लक्ष आणि सीमाप्रदेशातील दहा लक्ष असे एकूण बासष्ट लक्ष भाषक झाडीबोली बोलतात. विदर्भातल्या शेतकर्यांकचं या रंगभूमीवर अलोट प्रेम आहे. त्यांनी त्यांची ही रंगभूमी टिकून राहण्यासाठी अथक प्रयत्न केलेले आहेत, या रंगभूमीवर काही ग्रुप्स १०० वर्षांपेक्षा जास्त काळ आपली कला सादर करीत आहेत. तमाशा, गोंधळ, दांढर, छत्तीसगडी नौटंकी आणि घोटुल यांचा झाडीपट्टी थिएटरवर विशेष प्रभाव आहे. ही नाटकं जंगलातल्या (झाडी) एका मोकळ्या भागात (पट्टी) केली जातात, म्हणूनच या रंग...