नदीकाठाची माती उपसल्याने वृक्ष उन्मळून पडण्याचा धोका
३परवानगीत दिलेल्या अटी-शर्तीचे सर्रास उल्लंघन.
रामटेक तालुका प्रतिनिधी:
रामटके तालुक्यातील शेतजीनीचा वापर माठेया प्रमाणावर विटा निर्माण करण्यासाठी केला जात असल्याचे चित्र आहे.विटनिर्माते त्यांना आवश्यक असलली परवानगी संबधित विभागाकडून घेतात मात्र परवानगीच्या वेळी नमूद करण्यात आललेल्या अटी व शर्तींचे सर्रास उल्लघंन विटनिर्माते करीत असल्याचे दिसून येते.नदी नाले व त्याच शेजारी असललेल्या वृक्षाची कत्तल माठेया प्रमाणावर सुरू असून त्यावर तात्काळ प्रतिबंध घालावा अशी अपेक्षा रामटेकचे आमदार डी मल्लिकार्जुन रडे्डी यांनी प्रशासनाला कली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की रामटेक तालुक्यात मोठया प्रमाणावर विटानिर्मीती केली जाते.यासाठी कामठी व नागपुर येथील मोठया लोकांनी रामटेक तालुक्यातील शेतजमीनी विकत घतेल्यात तर अनेकांनी शेतमालकांकडून या जमीनी भाडेतत्वावरही घतेल्या आहेत.यासाठी त्यांनी तहसिलदार,उपविभागीय अधिकारी व जिल्हाधिकारी याचेकडून आवष्यक असलेल्या परवानगीही मीळवल्या आहेत.मात्र या परवानगीत नमूद करण्यात आलले नियमांची सर्रास पायमल्ली करून या तालुक्यातील संपन्न असलेला निसर्गठेवा मात्र यामुळे ऱ्हास पावत असल्याची खंत रामटेकच्या आमदार रेड्डी यांनी बालेतांना व्यक्त कली.
रामटेक तालुक्यांतील भिलेवाड़ा भांदेवाडा,मुसेवाडी,मुरडा,चिचदा,महारापेठ, व देवलापार भागातील अनेक गावांशेजार हे वीटभट्या लावलेले आहेत मात्र एकदा परवानगी दिली की ते कीती विटा निर्माण करतात,शासकीय जागवेर व वनजमीनीवर त्यांनी अतिक्रमण केले आहे का,नदीकाठी त्यांनी कीती व कसे खोदकाम कले याबाबत मात्र शासनस्तरावर कुठलीही नियीमत तपासणी केली जात नाही व त्यामुळे हे विटनिर्माते सर्रास शासनसंपत्तीची लूट करीत असल्याचे तालुक्यात सर्वदूर दिसून यते आहे.या विटनिर्मात्यांवर कुणाचाच वचक राहीलेला नाही.ते संघटीत असल्याने लगेच आपली युनियनबाजी करतात व शासकीय अधिकारी यांचेवरही दबाव टाकत असल्याचेहि चित्र आहे.