ब्रम्हपुरी ग्रामीण प्रतिनिधी :- गुलाब ठाकरे
दक्षिण
परिसराअंतर्गत येणाऱ्या हळदा (मुडझा )येथील ज्ञानगंगा विद्यालयात नुकत्याच झालेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी
करण्यात आली क्रांतिज्योती सावत्रीबाई फुले ह्या मराठी शिक्षण प्रसारक,
समाजसुधारक महिला होत्या. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक
टप्प्यात त्यांचे पती क्रांतीसूर्य जोतिराव फुले यांच्यासह त्यांनी मोठी
कामगिरी बजावली.
सावित्रीबाई फुलेच्या जयंती निमित्त
शाळेतील आदर्श विध्यार्थीनी कांचन आवारी, व योगीता बावणे , क्रिष्णा मस्के
, प्राची नरुले, आचल देशमुख, , आरती मायनकर, यानी सावित्रीबाईच्या
प्रतिमेला मालार्पण करून सावित्रीबाईच्या जीवनावर आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाची
प्रास्थावीक मार्गदर्शन शिक्षक श्री.वाय. एन.खोब्रागडे यानी समाजात
मनाचे स्थान मिळत नव्हते ; शिक्षांपासून आणि स्वातंत्र्यापासून दूर ठेवून
स्त्रीला परावलंबी आणि परतंत्र ठेवले जात होते त्या काळात सावित्रीबाईचा
जन्म झाला पुढे मात्र सावित्रीबाईना, ज्योतिबा फुले यांचा उदार दृष्टी कोण
असल्याने , स्वतःचे व्यक्तिमत्व घडविण्याची संधी प्राप्त झाली असे
विध्यार्थी विध्यार्थ्याना स्त्री शिक्षणाविषयी मौल्यवान मनोगत व्यक्त
केले.
यावेळी शाळेतील मुख्याध्यापक जे.के.ठाकरे,
एस.के.दडमल,ओ.जी.ऊइके, आर.बी.घोड़ीचोर, एस.एम.कुँभरे, वामन कोटगले,
विघ्नेश्वर तुपटे, रवि नखाते , पुरुषोत्तम दीघोरे ,व इतर शिक्षक
शिक्षकोंत्तर यांच्या प्रमुख उपस्थितित जयंती साजरी करण्यात आली.सर्वप्रमुख
मान्यवराँचे समालोचन ज्ञानेश्वरी धारने तर आभारप्राची नरुले यानी मानले.