चंद्रपूर - ‘क ‘ आणि ‘ड’ संवर्गातील महानगरपालिकाच्या आयुक्त आणि महापौर यांच्या वाहनांवर लाल दिवे काढण्यात येणार आहेत. या आदेशामुळे आता महापौर आणि आयुक्तांना त्यांच्या वाहनांवर लाल आणि अंबर दिवे लावता येणार नाहीत.
शासनाकडून काढण्यात आलेला हा अध्यादेश राज्यातील २६ महानगर पालिकांपैकी ‘क ‘ आणि ‘ड’ संवर्गातील महानगरपालिकांसाठी लागू असणार आहे. त्यानुसार राज्यातील २६ महानगरपालिकांपैकी ‘अ’ संवर्गात मुंबई महानगरपालिका तर ‘ब’ वर्गात पुणे आणि नागपूर महापालिकेचा समावेश होत असल्याने येथील महापौर व आयुक्तांना हा नियम लागू नाही. त्यामुळे त्यांना मात्र आपल्या वाहनावर लाल, अंबर दिवे लावता येणार आहेत.
मात्र राज्यातील उर्वरित २३ महानगरपालिकांतील आयुक्त व महापौरांना अश्या पद्धतीने दिवे लावता येणार नाहीत. विशेष म्हणजे दिवे न लावनाऱ्यांच्या यादीमध्ये विविध विद्यापीठाचे कुलगुरू, विविध महामंडळाचे अध्यक्ष आणि जिल्हा व सत्र न्यायाधीशांनाही वगळण्यात आले आहे.