সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Monday, October 21, 2013

अवैध गुटखा विक्री : पसार विक्रेते पोलिसांच्या जाळ्यात

चन्द्रपुर- परराज्यातून आणलेला गुटखा व तंबाखूची अवैध विक्री करणा-या  गोदामावर छापे मारून २० लाखाचा अवैध गुटखा जप्त केल्यानंतर पसार झालेल्या अनिल राजकुमार पंजवानी, जितेंद्र प्रेमजीभाई ठक्कर व नूतन ठक्कर या तिघांना शहर पोलिसांनी सोमवारी दुपारी अटक केली. 
आंध्रप्रदेश व छत्तीसगड राज्यातून सुगंधी तंबाखू व गुटखा आणायचा आणि त्याची पूर्व विदर्भातील चार जिल्हय़ात जादा दराने विक्रीचा गोरखधंदा अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सतर्कतेने उघडकीस आला आहे. पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया व भंडारा या चार जिल्हय़ांना आंध्रप्रदेश व छत्तीसगडचा सीमावर्ती भाग लागू आहे. आज महाराष्ट्रात संपूर्ण गुटखा बंदी करण्यात आलेली आहे. त्यामुळे छोटे मोठे पानठेले व टपऱ्याुवर गुटखा किंवा तंबाखू शोधून सुध्दा मिळत नाही. कारवाईच्या भीतीने सुध्दा हे छोटे दुकानदार गुटखा ठेवत नाहीत. मात्र गुटखा विक्रीच्या तस्करीत बडे व्यापारी गुंतले असल्याची माहिती अनिल पंजवानी, जितेंद्र व नूतन ठक्कर यांच्यावरील कारवाईतून समोर आली आहे. हे तिन्ही व्यापारी छत्तीसगड व आंध्र प्रदेशातून गुटखा व सुगंधित तंबाखू चोरटय़ा मार्गाने आणायचे आणि पूर्व विदड्टरातील शहरी आणि ग्रामीण ड्टाागात त्याची खुलेआम विक्री सुरू होती. येथील बागला चौकातील मुन्नालाल बागला यांच्या मालकीची गोदामे आहेत. यातील तीन गोदाम अनिल राजकुमार पंजवानी, जितेंद्र प्रेमजीभाई ठक्कर आणि नूतन प्रेमजीभाई ठक्कर यांनी भाडय़ाने घेतली होती. या तिघांच्याही गोदामातून सुगंधित तुबाखू आणि तत्सम पदार्थाची छुप्या मार्गाने विक्री केली जात होती. लगच्या आंध्रप्रदेश व छत्तीसगड राज्यातून तंबाखू व गुटखा आणायचा आणि या तसेच गडचिरोली जिल्हय़ात जादा किंमतीने विक्री करण्याचा हा गोरखधंदा हे तीन तंबाखू तस्कर गेल्या अनेक दिवसांपासून करीत होते. एकीकडे समाजात प्रतिष्ठीत म्हणून वावरायचे आणि दुसरीकडे तस्करीचा काळा धंदा करायचा असा या तिघांचा व्यवसाय होता. या गोदामातून सुगंधित तंबाखूची विक्री केली जात असल्याची गुप्त माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिका-ना मिळाली होती. गेल्या काही दिवसांपासून या खात्याचे अधिकारी गोदाम व ठक्कर बंधू आणि पंजवानी या तिघांवर नजर ठेवून होते. दोन दिवसापूर्वीच या गोदामात वीस लाखाचा माल आल्याची माहिती मिळताच शनिवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास अन्न व औषध प्रशासन विड्टाागाच्या अधिकाऱ्यांनी ठक्कर व पंजवानी यांच्या गोदामावर छापे टाकले. या तीन गोदामात मोठय़ा प्रमाणावर माल असल्याचे बघून अधिकारीही चक्रावून गेले. सुगंधित तंबाखू, मजा, गुटखा आणि अन्य तत्सम पदार्थाचे मोठे बॉक्स या गोदामात मिळाले. रात्री उशिरा दहा वाजेपर्यंत ही कारवाई सुरू होती. यावेळी गोदामातून १९ लाख ५० हजाराचा माल जप्त करण्यात आला.
या तिन्ही गोदामातील संपूर्ण गुटखा हा चंद्रपूर तालुक्यात वितरित केला जाता होता. तसेच शहरातील काही बडय़ा व्यापाऱ्यांना सुध्दा तंबाखू आणि तत्सम पदार्थाची विक्री करण्यात येत होती अशीही माहिती तपासात समोर आली आहे. ठक्कर बंधू व पंजवानी यांच्याकडून जिल्हय़ातील गोंडपिंपरी, राजुरा, कोरपना, जिवती तसेच मूल, सावली, भद्रावती वरोरा, चिमूर, ब्रम्हपुरी, नागभीड व सिंदेवाही आणि बल्लारपूर या तालुक्यांमध्ये सुध्दा माल पोहोचविला जात होता. अन्न व औषध प्रशासन या तिघांवर कारवाई केली असली तरी गुटखा व तंबाखू तस्करीचे हे रॅकेट मोठे असल्याची माहिती तपासात समोर आली असून, शहरालगतच्या एका गावात मोठे गोडाऊन असल्याची माहिती आहे. 
छत्तीसगड व आंध्रप्रदेशात या तिघांचे पगारी कर्मचारी सक्रिय असून त्यांच्या माध्यमातूनच या जिल्हय़ात हा माल आणला जात असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच बहुतांश तालुक्यांच्या ठिकाणी सुध्दा या तिघांचे गोदाम आहेत. रॅल्वे किंवा खासगी मालवाहक ट्रकच्या माध्यमातून हा तंबाखू या जिल्हय़ात आणला जायचा आणि इथून तो ग्रामीण भागात वितरीत केला जात असल्याची माहिती आहे. दरम्यान या कारवाइने तंबाखू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान अन्न व औषध प्रशासन विभागाच्या चंद्रपूर कार्यालयाने गोंदिया, भंडारा व गडचिरोली येथील जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधून पूर्व विदर्भात चालणाऱ्या गुटखा व तंबाखूच्या तस्करीच्या विरोधात संयुक्त अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.