नवरगाव(अर्हेर) येथील घटना
ब्रम्हपूरी« जादुटोण्याच्या संशयावरून २0 वर्षिय युवकाने शेजारी वास्तव्य करणार्या ५५ वर्षिय इसमाची निघरूण हत्या केली. ही घटना १३ ऑक्टोबरला तालुक्यातील नवरगाव(अर्हेर) येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी दादू उर्फ आशीष अतुल देवतळे यास अटक केली. महादेव भागडकर असे मृताचे नाव आहे.
काही दिवसांपूर्वी आरोपी आशीषने सुनेची छेड काढल्याच्या कारणावरून महादेव भागडकर व त्यांच्या मुलाने आशीषला मारहाण केली होती. तेव्हापासून दोन्ही घरचे सबंध वितृष्टाला आले होते. महादेव भागडकर हा देवदेवतांची परिवारासह पूजा करायचा. मात्र पूजाअर्चा करून तो जादुटोणा करतो, असा अशीषचा समज झाला. यातच आशीषच्या काही जनावरांचा मृत्यू झाला तर कुटुंबातील सदस्यांची प्रकृती बरी राहत नव्हती. आशीषच्या पायात गाठ निर्माण झाली. मात्र औषधोपचार केल्यानंतरही सुधारणा झाली नाही. त्यामुळे महादेवनेच करणी केल्याची अंधर्शद्धा त्याच्या मनात निर्माण झाली आणि महादेवचा काटा काढण्याचे ठरविले.
आज रविवारला शारदा विसर्जनासाठी मिरवणूक काढण्यात आली. त्यात संपूर्ण गावातील नागरिक सहभागी झाले. पण महादेव काही कारणास्तव मिरवणूकीत आला नव्हता. महादेवच्या कुटुंबातील सदस्य मिरवणुकीत सहभागी होते. याचदरम्यान महादेवच्या मार्गावर असलेला आशीषही मिरवणुकीत सहभागी होता. महादेव घरी गेल्याचे लक्षात येताच आरोपी आशीष महादेवच्या घरी गेला. त्याच्याच घरच्या कुर्हाडीने महादेववर वार करून जागीच मुडदा पाडला. रक्ताच्या थारोळ्यात महादेव पडताच आरोपीने पळ काढला. सायंकाळी सात वाजता त्याची पत्नी घरी येताच तिला पती मृत्यू पावलेला दिसला आणि एकच हंबरडा फोडला. घटनेची तक्रार पोलिसात नोंदविण्यात आली. पोलिसानी लागलीच गाव गाठून पंचनामा केला आणि प्रेत शवविच्छेदनासाठी पाठविले. पोलिस पंचनामा करीत असताना मृतकाजवळ कुर्हाड व दुप्पटा आढळला. मृतकाच्या कुटुंबांनी कुर्हाड आमची असल्याचे सांगितले पण दुप्पटा नाही. त्यामुळे पोलिसी बंदूकीचा धाक दाखवताच दुप्पट्टा असणारा व्यक्ती समोर आला आणि त्याने आशीषने दुप्पटा नेल्याची कबुली दिली. त्यानंतर आशीषचे घर गाठून त्यांना ताब्यात घेतले असता, त्याने गुन्ह्य़ाची कबुली दिली.